सावधान! ‘बाहुबली’ची ‘भेडिया’ सोबत होणार टक्कर.
बाहुबली चित्रपटापासून भारता सोबतच संपूर्ण जगात कीर्ती गाजवणारा अभिनेता प्रभास याने त्याचा आगामी चित्रपट ‘सलार’ १४ एप्रिल २०२२ ला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. याच दिवशी वरून धवनचा आगामी चित्रपट ‘भेडिया’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
K.G.F. सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक ‘प्रशांत निल’ आता ‘सलार’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याने आणि बाहुबली म्हणून ओळखला जाणारा प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. तर दुसरीकडे स्त्री (२०१८) सारखा भयपट विनोदी चित्रपट, बाबा (२०१७) आणि बाला (२०१९) चे दिग्दर्शक ‘अमर कौशिक’ आता ‘भेडिया’ चे दिग्दर्शन करणार आहे.
वरून धवनला चांगले मार्गदर्शन व पात्र मिळाल्याने तो कशी भूमिका करू शकतो, हे आपण बदलापूर (२०१५) या चित्रपटात बघितले होते. यामुळे ‘भेडिया’पासून देखील प्रेक्षकांना मोठी अपेक्षा आहे. तर आता बाहुबली आणि भेडिया मधून कोण बाजी मारणार, हे पाहण्यासाठी १४ एप्रिल २०२२ ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.