जाणून घ्या केसांच्या गळण्यामागची प्रमुख कारणे.
एखाद्या व्यक्तीचे दररोज ७० ते १०० केस गळत असल्यास घाबरण्याचे कारण नाही.
कारण केसगळती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
पण जेव्हा अति प्रमाणात केसगळती होते, तेव्हा या समस्येवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
केसगळती होण्यामागे पुढील माहिती उपयुक्त ठरेल.
केसगळतीच्या समस्येपासुन सुटका मिळवण्यासाठी महिला तसेच पुरुष देखील वेगवगळे उपाय करत असतात.
मुळात केस गळती ही सामान्य समस्या आहे, परंतु जेव्हा केसांची वाढ संथगतीने होते तेव्हा ही समस्या गंभीर रुप धारण करते.
केस गळण्यामागे अनेक कारणे असु शकतात. वैद्यकीय परिस्थिती, हार्मोनल बदल किंवा काही वेळा अनुवंशिकतेमुळेही तुमचे केस गळु शकतात.
पौष्टीक आहार आणि कमी ताण तणाव घेतल्यास केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होवु शकते.
परंतु केसगळती होण्यामागे काही प्रमुख कारणे असु शकतात.
१. पौष्टीक आहार घ्या –
पौष्टीक आहारामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे केसांमध्येही काही चांगले बदल झालेले तुम्हाला दिसतील.
नियमित व्यायामासह आहारात मांस, मासे, सुकामेवा आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असणे गरजेचे आहे.
२. ताण कमी करा –
ऑफीस असो किंवा घरातील अन्य काही समस्या, अनेकांना छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेण्याची सवय असते.
तणावामुळे हेअर फॉलची समस्या वाढते त्यामुळे केसांची वाढ खुंटते व अधिक प्रमाणात केस गळु शकतात.
ताण दूर केल्यास या समस्येपासुन तुम्ही मुक्त होऊ शकता.
३. हेअर स्टायलिंग टुलचा वापर कमी करा –
हेअर स्टायलिंगच्या अतिवापरामुळे त्वचेवरील छिद्रांवर गंभीर आणि हानिकारक परिणाम होतात.
यामुळे केस कोरडे आणि कमजोर होतात. या उपकरणांचा अधिक वापराने केसांच्या वाढीवर दुष्परिणाम होवु शकतात.
शिवाय तुमचे केस पातळ आणि कमकुवत होतात.
४. केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर टाळा –
केसांसाठी केमिकल फ्रि प्रोडक्ट वापरावे. लांब केसांसाठी पोषण तत्त्वांची आवश्यकता आधिक प्रमाणात असते. त्यामुळे केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करणे टाळा.
श्रुती बहिरगावकर