पेट्रोलियम उत्पादने जीएसटी अंतर्गत आणणे चांगला निर्णय ठरू शकेल : के व्ही सुब्रमण्यम
पेट्रोलियम ची उत्पादने जीएसटी कराच्या कक्षेत आणणे हा एक चांगला निर्णय ठरू शकेल असे मत रविवारी चीफ इकॉनॉमिक ऑफिसर के व्ही सुब्रमण्यम यांनी मांडले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या सभासदांशी बोलताना ” हा एक चांगला प्रस्ताव असून तो फायदेशीर ठरू शकेल पण हा जीएसटी परिषदेचा निर्णय आहे” असे वक्तव्य सुब्रमण्यम यांनी केले.
या आधी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे पेट्रोलियम उत्पादने जीएसटी अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव मांडला होता.
देशभरात सामान्य जनतेला सतत वाढत असणार्या या उत्पादनांच्या किमतीचा रोज फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर या किमती कश्या कमी होतील यावर तोडगा म्हणुन हा निर्णय घेतल्या जाऊ शकतो.