असं काय घडलं शुक्रवारी अंटार्टिकावर…
जागतिक तापमान वाढीचे परिणाम हळूहळू समोर येत आहेत,त्यात बर्फ वितळण्याचे प्रमाण जास्त आहे. अशीच एक चिंताजनक घटना अंटार्क्टिका खंडावर घडली आहे. अंटार्टिका मध्ये “ब्रांत आईस शेल्फ” मधून प्रचंड मोठा बर्फाचा भूभाग शुक्रवारी तुटून वेगळा झाला ही जागा ब्रिटनच्या “सायंटिफिक आउटपोस्ट” पासून जास्त दूर नाही. आईस बर्ग चा तुटलेला तुकडा हा ४९० चौरस मैल म्हणजे च १२७० चौरस किमी चा आहे आणि महत्वाचे म्हणजे हा भूभाग न्यूयार्क शहरापेक्षा ही प्रचंड मोठा आहे असा दावा “ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वे” (बिएएस) या संस्थेने केला आहे. या विभागलेल्या भागाची जाडी एकशे पन्नास मीटर एवढी आहे असे बीएएस संस्थेने सांगितले आहे. त्यामध्ये प्रचंड मोठ्या भेगा पडल्याने एक मोठ्या आकाराचा बर्फाचा भूभाग खंडापासून वेगळा होण्याचा अंदाज वैज्ञानिक बांधत होते या जागेने दरीचे स्वरूप घेतले. नोव्हेंबर महिन्यात येथे दरी दिसून आली होती ,आणि ती दरी जानेवारी महिन्यामध्ये एक किलोमीटर पर्यंत वाढत गेली.
बीएएस या संस्थेने काही दिवसांपूर्वी या भूभागाचा व्हिडिओ कॅमेरात कैद केला होता यामध्ये हिमनगाची खूप लांब दरी दिसत आहे ही दरी शुक्रवारी सकाळी कित्येक शेकडो मिटर रुंदावली या कारणाने हा हिमनग वेगळा झाला बीएएस च्या संचालिका “जैन फ्रान्सिस” यांचे म्हणणे आहे की,आमची टीम या गंभीर समस्येला सामोरे जाण्यास खूप वर्षांपासून तयार होती. सॅटेलाइट इमेज आणि नेटवर्कच्या सहाय्याने या जागेचा दररोज तपशील घेतला जातो आणि ही माहिती केंब्रिजमध्ये विश्लेषणासाठी पाठवली जाते यामुळेच आम्हाला अंटार्टिका खंडावर काय हालचाली होतात हे आम्हाला समजते.
बीएएसची हेली संशोधन संस्था तुर्तास थंडी मुळे बंद आहे. येथे राहणाऱ्या बारा वैज्ञानिकांचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला निघून गेला होता. १९५६ मध्ये ब्रेंट आइस सेल्फ वर खूपसाऱ्या ठिकाणावर सहा हेवी रिसर्च सेंटर बनले आहेत. हिवाळ्यामध्ये येथे एकही कर्मचारी राहत नाहीत. यावेळी येथील तापमान उणे ५० अंश सेल्सिअस पर्यंत उतरते बीएएस या संस्थेने काळजीपोटी २०१६ साली हेली रिसर्च संस्थेची जागा बदलली होती. २०१७ नंतर कर्मचारी फक्त उन्हाळ्या मध्ये काम करत आहे. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे तिथून निघणे कठीण असते.
दरवर्षी २ किमी पर्यंत खचून जातो बर्फाचा थर
हा हिमनग दरवर्षी जवळ जवळ दोन किमी पर्यंत समुद्राच्या दिशेने जात आहे याचेच काही भाग वेगवेगळे होत असतात बीएस संस्थेच्या मते ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. २०१७ साली सुद्धा लार्सन सी नावाच्या हिमनग पेक्षाही मोठा हिमनग तूटून वेगळा झाला होता. मागच्या वर्षीच्या अखेरपर्यंत हा समुद्रावर तरंगत होता लार्सन सी हिमनगावर पाहिलेल्या घटनांचा या घटनांशी काहीही संबंध नाही आहे.
अंटार्टिका बद्दल काही विशेष माहिती
या गोष्टीचा कोणताही असा पुरावा नाही की हिमनग वेगळा होण्याच्या मागे वातावरण बदलाचा संबंध आहे.
१. अंटार्टिका चा ९८% भाग बर्फाने झाकलेला आहे जास्त बर्फाची चादर असे म्हंटले जाते . याची जाडी दोन ते पाच किमी आहे
२. या महाद्वीपवरती तटीय मैदान नाही आहे इथे केवळ २% भूभाग बर्फमुक्त होतो.
- यास गतिशीलआणि सक्रिय महाद्वीप म्हणूनही ओळखले जाते कारण अंटार्क्टिका चा आकार वातावरणाच्या बदलानुसार बदलतो.
- विदा अंटार्क्टिका येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
- २२ मार्च ते २३ सप्टेंबर या काळात सूर्योदय होत नाही आणि २४ सप्टेंबर २१ मार्च यादरम्यान दार सूर्यास्त होत नाही.