स्वातंत्र्य जाहीर करा, SFJ चं उद्धव ठाकरे , ममता बॅनर्जी यांना आवाहन, भारतापासून वेगळं व्हा
भारतापासून वेगळं होत असल्याचं महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालने जाहीर करावं, यासाठी ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवलं होतं. दोन्ही राज्यांनी भारतीय संघ राज्य व्यवस्थेतून बाहेर पडून स्वातंत्र्य जाहीर करावं आणि संबंध तोडून टाकावेत अशी मागणी ‘शीख फॉर जस्टिस’ने केली होती.
आता त्यांनी त्यापुढे जात, एक वेबसाइट लाँच केली आहे. त्या माध्यमातून SFJ च्या मागणीची दखल घ्यावी, यासाठी त्यांनी लोकांना दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवण्याचे आवाहन केले आहे. ‘शीख फॉर जस्टिस’ ही स्वतंत्र खलिस्तानचे समर्थन करणारी देशविरोधी संघटना आहे. भारत सरकारने शीख फॉर जस्टिसवर बंदी घातली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.