लाइफस्टाइल

किवीच्या सेवनाने दूर होतील आरोग्याच्या अनेक समस्या.

कीवी हे फळ आरोग्यासाठी अतीशय फायदेशीर मानले जाते. याची चव तीखट-गोड असल्याने गोड आणि तीखट दोन्ही प्रकारच्या पदार्थांमध्ये कीवीचा वापर केला जातो. काही लोकांना याच्या सालाची चव आवडत नाही परंतु पुर्ण कीवी खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशिर असते. कीवीचा वापर प्रामुख्याने कार्डीयोमस्क्युलर रोगांसाठी, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच डोळ्यांच्या समस्येसाठी केला जातो. अनेक आजारांवर कीवी फायदेशीर ठरते. शरीराला गरजेचे असणारे सगळे घटक यामध्ये असतात.
१) व्हीटॅमिन सीचा उत्तम स्त्रोतच – व्हीटॅमिन-सी आपल्या शरीरात ‌ॲटीऑक्सीडंट्सच्या प्रमाणात काम करते आणि आपल्या शरीराला कॅंसरसारख्या भयावह रोगापासुन वाचवते तसेच व्हीटॅमिन ब शरीराची रोगप्रतीकारक क्षमता वाढवण्यास मदत करते.
२) त्वचेसाठी उपयुक्त किवी – असे म्हटले जाते की, एक संतुलीत शरीर तेच असते ज्यात पीएचचे उत्तम संतुलन असते. यामुळे आपले शरीर सक्रीय, फ्रेश आणि त्वचेला तरुण ठेवण्यास मदत होते.
त्वचा सुंदर ठेवण्यासाठी चेहर-यावर कीवी लावा.
३) पचनक्रीया सुधरण्यास मदत – किवीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. याचे सेवन केल्यास अपचनाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही.
४) डायबीटीजवर गुणकारी – किवी तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढू देत नाही. त्यामुळे डायबीटीज असणारे लोक देखील कीवीचे सेवन करु शकतात.
५) चांगल्या झोपेसाठी किवी – झोप न येण्याच्या समस्येवर किवी एक चांगला उपाय आहे. युवकांना आणि लहान मुलांना पुरेशी झोप येत नसेल तर त्यांनी कीवीचे सेवन करावे. यामुळे अधिक काळापर्यंत गाढ झोप लागु शकते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *