लाइफस्टाइल

कोरड्या त्वचेसाठी घरीच बनवा नैसर्गिक फेस मास्क.

होम मेड फेस मास्क आपल्याला हिवाळ्यातील कोरड्या त्वचेच्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत करते.
हिवाळ्यात कोरडी त्वचा मॅनेज करणे थोडे कठीण होते.  कोणतेही मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावा थोड्यावेळाने पुन्हा चेहरा कोरडा होईल. कोरड्या त्वचेला बरे करण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क  देखील वापरतात परंतु त्याचा प्रभावही काही दिवसच टिकतो. परंतु असे काही नैसर्गिक फेस मास्क आहेत जे आपण सहजपणे घरी बनवू शकतो. त्यांचा वापर केल्याने त्वचा बऱ्याच काळापर्यंत ओलसर राहते.

[१] कोरफडीचा फेस मास्क :
कोरफड मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात जे शरीर आणि त्वचा दोन्ही मध्ये फायदेशीर आहेत.  एलोवेरा फेस मास बनवण्यासाठी कोरफड मधून जेल बाहेर काढा त्यात काकडीचा रस घाला हा मास्क फेस वॉश नंतर चेहर्‍यावर लावा आणि नंतर थोड्यावेळाने चेहरा धुवा . हे केवळ चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करणार नाही तर चेहऱ्यावर  चमकही दर्शवेल.

[२] एवोकाडो  फेस  मास्क :
फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते. चेहऱ्यावरील चमक टिकून असते .एवोकाडो मध्ये भरपूर पोषक तत्वे असतात , जे त्वचेस निरोगी बनवतात कोरडी व खराब झालेली त्वचा काढून टाकून ते त्वचेस कोमल बनवते. हे   फेस मास्क तयार करण्यासाठी दोन चमचे मॅश केलेला एवोकाडो मध्ये एक चमचा मध आणि एक चमचा गुलाबाचं पाणी घाला आणि चांगले मिक्स करा मग ते चेहरा स्वच्छ करून झाल्यावर चेहऱ्यावर लावा.

[३] स्ट्रॉबेरी फेस मास्क :
स्ट्रॉबेरी मुळे केवळ त्वचा कोमलच् होत नाही तर चमक देते . तिच्या मध्ये असलेले विटामिन सी त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करते .तिच्या वापरामुळे त्वचेत गोठलेल्या मृतपेशी निघून जातात .दोन ते तीन मोठ्या स्ट्रॉबेरी मॅश करून त्यात एक चमचा मध एक चमचा  ओटचे पीठ मिक्स करून पेस्ट बनवा आणि नंतर त्याच्या चेहर्‍यावर लावा आणि वीस मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आठवड्यातून असे दोन वेळा करा.

[४] पपईचा फेस मास्क :
पपई  आरोग्य आणि सौंदर्य या दोघांसाठी उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट मानली जाते . त्यात पोटॅशियम असते जे त्वचेस आणि सुंदर ठेवते . हे त्वचेचा असलेल्या  मृतपेशी आणि डाग साफ करण्यासाठी देखील मदत करते . पपईचा फेस मास्क बनवण्यासाठी पिकलेल्या पपई पासून एक कप्  पेस्ट बनवा नंतर त्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घाला आणि चेहर्‍यावर लावा दहा मिनिटांनी पाण्याने चेहरा धुवा.

[५] केळी फेस मास्क :
कोरड्या त्वचेसाठी ओलावा देऊन त्यास चमकदार बनवण्यास मदत करते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा संपतो शिवाय सुरकुतलेल्या समस्यादेखील संपते तसेच त्वचा घट्ट राहण्यास मदत करते.
केळीचा फेस मास्क बनवण्यासाठी एक पिकलेली केळी चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या त्यात एक चमचा मध एक चमचा ऑलिव्ह तेल आणि अर्धा चमचा चंदन पावडर घाला . आता हा मास्क चेहर्‍यावर लावा तो कोरड्या झाल्या नंतर कोमट पाण्याने धुवा.

                                                      – ऐश्वर्या शिलवंत 

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *