मालदीवच्या समुद्रावर शिल्पाचा घायाळ अंदाज
शिल्पा शेट्टीने मालदीवमधील एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोत शिल्पा समुद्राच्या किनाऱ्यावर बसून बीचवर आनंद लुटताना दिसत आहे. शिल्पाने अनेक फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. ज्यात ती आपल्या मैत्रीण आकांक्षा आणि पती राज कुंद्रा सोबत एन्जॉय करताना दिसत आहे.
या अगोदरही शिल्पाने डॉल्फिनच्या एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी राज कुंद्रा देखील शिल्पाच्या सोबत दिसत होते. राज कुंद्रा यांनी इंस्टाग्राम वर ब्रेकफास्ट करतानाच एक व्हिडिओ शेअर केला होता आणि लिहिलं की “पावरी हो रही हैं”. व्हिडीओमध्ये दिसतंय की हे दोघे आपल्या मित्रांसोबत सुंदर जागेवर ब्रेकफास्ट करताना दिसत होते.
शिल्पा शेट्टी लाॅकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालवला आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून चाहत्यांशीही संपर्क साधला. लाॅकडाऊननंतर ती पुन्हा एकदा बाहेर पडली आणि आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.