जयललितांच्या भुमिकेत कंगनाचा पॉलिटिकल पंगा
अभिनेत्री कंगना रानौत सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री कंगना रानौत मुख्य भूमिका असलेला आणि राजकीय नेत्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या दरम्यान जयललिता यांच्या जयंतीनिमित्त कंगनाने ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन पोस्टर मीडियावर आपल्या चाहत्यांना शेअर केले आहे. २३ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “सिनेमाचा चेहरा बदलण्यापासून ते राज्याचे नशीब बलण्यापर्यंत जया अम्माने लाखो लोकांचे नशिब बदलले आहे”. अशा आशयाचे कॅप्शन कंगनाने लिहिले आहे.
थलायवी हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कंगना रनैतची मुख्य भूमिका असल्यामुळे मागील कित्येक दिवसापासून थलायवी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो असे कंगनाच्या चाहत्यांना झाले होते. विशेष म्हणजे हा चित्रपट राजकीय नेत्या जयललिता यांच्या जीवणावर आधारित असल्यामुळे या चित्रपटाची सध्या विशेष चर्चा सुरू आहे. हा चित्रपट येत्या एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु करोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण परिस्थितीच बदलली त्यामुळे हा चित्रपट आता कधी प्रदर्शित होणार हे येणारी वेळच सांगेल.