हॉलिवूड अभिनेत्री एम्मा वॉटसन देणार अभिनय क्षेत्राला निरोप!
अनेक तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे एम्मा वॉटसन. नेहमीच सोशल मीडियावर चाहती राहिलेली आणि फक्त इतकेच नव्हे तर आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना भुरळ पडणारी अशी ही हॉलिवूड अभिनेत्री. जिने अभिनय क्षेत्राला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे.
एम्माने हॅरी पॉटर या चित्रपटाच्या मालिकेपासून आपल्या करिअरची सुरवात केली होती. यामध्ये बालकलाकार म्हणून ती पुढे आली आणि तेव्हा पासून असलेला तिचा चाहता वर्ग पुढे वाढतच गेला. एम्मा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. आणि म्हणूनच आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आणि त्यांच्या नात्याला पूर्ण वेळ देता यावा यासाठी एम्माने अभिनय क्षेत्राला निरोप देण्याचे ठरवले आहे.
असे असले तरी हा निरोप कायमचा राहील की काही काळानंतर ती परत कमबॅक करेल, हे अजून स्पष्ट नाही. परंतु तीच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तसेच तिला परत पडद्यावर कधी पाहायला मिळेल याची वाट ते बघताय.
