स्पोर्ट्स

अमेरिकेचा गोल्फपटू टायगर वूड्‌स कार अपघातात गंभीर जखमी

अमेरिकेतील लॉस एंजेल्स येथे झालेल्या कार अपघातात प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला अनेक ठिकाणी फॅक्चर झाले आहे. वूड्स हा हॉथोर्न बुलेवार्डकडे वेगाने जात असताना गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला धडकली. वूड्सला जेव्हा गाडीतून बाहेर काढलं, त्यावेळी तो रक्तबंबाळ होता. यादरम्यान वूड्सच्या गाडीतील एअरबॅग उगडली ज्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याने आपल्या बोटांनी पुढील विंडशील्ड उघडली ज्यातून त्याला बाहेर काढण्यात आले.अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले.

कोण आहे टायगर वूड्स?
जगातील सर्वोतम गोल्फर म्हणून वूड्स प्रसिद्ध आहे .वूड्स ने १५ वेळा गोल्फ चॅम्पियनशिप जिंकली आहे व तब्बल ६८३ आठवडे त्याने न. १ रँकिंग राखले आहे. १९९६ – २००८ हा कालावधी वूड्स चा काळ म्हणून ओळखला जाऊ शकतो.२०१० मध्ये त्याला फोर्ब्स मॅगझिन ने सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून घोषित केले होते.
विवादित व्यक्तिमत्व – 

 वूड्स हा सतत विवादाच्या भोवऱ्यात असतो.२००९ मध्ये टायगरच्या कारकिर्दीला विवाहबाह्य संबंध, पत्नीवियोगाचे चटके बसले. याच काळात त्याचा अपघात झाला. पाठीच्या दुखण्यामुळे शस्त्रक्रियेच्या दिव्यातून जावे लागले. ऐन भरात अकरा वर्षे तो गोल्फपासून दुरावला. त्याच्या खेळावर त्याने परिणाम झाला. परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने परत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा दबदबा निर्माण केला.

ह्या अपघाता नंतर वूड्स ची कारकिर्द संपेल अशी भीती वर्तवली जात आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *