भारताकडून इंग्लंडची ‘फिरकी’
टीम ईंडीयाची पहील्या स्थानी झेप !
टीम इंडियाने अहमदाबादमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या दिवस रात्र कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 49 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाच्या शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने पूर्ण केले. रोहित आणि शुबमन या सलामी जोडीने अनुक्रमे नाबाद २५ आणि १५ धावा केल्या. या विजयासह भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे .सामन्यात ११ बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीर पुस्काराचा मानकरी ठरला.अश्विनने ४८ धावांत ४ बळी घेतले आणि ४०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या विशेष क्लबमधे स्थान मिळवले. यासह इंग्लंडचे भारतात कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न धुळीत मिळाले.
दरम्यान या पराभवासह इंग्लंडला दुसरा झटका बसला आहे. या पराभवामुळे इंग्लंडचे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम सामन्यात खेळण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले आहे. या उभय संघातील कसोटी मालिकेच्या निकालावर टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दुसऱ्या संघाचे भवितव्य ठरणार होते. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने आधीच धडक मारली आहे. या एका जागेसाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ स्पर्धेत होते. इंग्लंडने चेन्नईतील पहिली कसोटी जिंकत आपली दावेदारी सिद्ध केली होती. पण त्यानंतरचे २ सामने जिंकत भारताने जोरदार पुनरागमन केलं. भारताने इंग्लंडवर चेन्नईतील दुसऱ्या सामन्यात ३१७ धावांनी तर तिसऱ्या कसोटीत १० विकेट्सने अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. यासह भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. तर इंग्लंडचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या विजया मुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील च्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी गेला आहे .