पीएनबी घोटाळ्याचा मुख्य आरोपी निरव मोदीला भारतात पाठवण्याची मंजुरी
ब्रिटिश कोर्टाचा निवाडा
टीम यंगिस्तान :
पीएनबी घोटाळ्याचा वाँटेड व ही-याचे व्यापारी निरव मोदी च्या भारत प्रत्यार्पणावर ब्रिटनच्या कोर्टामध्ये गुरुवारी शेवटची सुनावणी झाली. त्यामध्ये निरव मोदी ला भारतात पाठविण्याची मंजुरी दिली गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीनंतर भारतामध्ये सुरू असलेल्या केसमध्ये नीरव मोदी आरोपी असल्याचे न्यायाधीश सेमोल गुजी यांनी म्हटले आहे. निरव मोदीने पुरावा नष्ट करण्याचे षडयंत्र सुद्धा रचले आहे. निरव मोदींना भारतात पाठवण्यात येत आहे याचा अर्थ असा नाही की त्यांना तिथे न्याय मिळणार नाही असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
कोर्टाने निरव मोदीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची याचिका पण फेटाळली आहे.सोबतच असेही नमुद केले की त्यांना कोणतीही अडचण नाही.
निरव मोदीला मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात हलवण्यात येत असून बॅरक क्र बारा मध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे. सोबतच ब्रिटनच्या न्यायाधीशांनी असेही सांगितले की निरव मोदी यांंना भारत प्रत्यार्पणानंंतर योग्य तो न्याय मिळू शकेल.
काय आहे पीएनबी घोटाळा ?
नीरव मोदी आणि त्यांचे मामा मेहुल चोक्सी यांनी बँकेच्या अधिका-यांंसोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेमध्ये जवळपास १४ हजार करोड रुपयांपेक्षाही अधिक कर्जाचा घोटाळा केला होता.हा घोटाळा हमीपत्राचा उपयोग करुन केला होता. त्यावर भारताने बँक घोटाळा व मनी लॉन्डिंगच्या गुन्ह्यामध्ये दोन प्रमुख घटना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि प्रवर्तन निर्देशालय(ईडी) यांंनी नोंदी केल्या. त्यापेक्षाही अनेक घटनांत त्यांंना दोषी ठरवण्यात आले आहे.निरव मोदीने भारतात परत पाठवण्याच्या आदेशावर ब्रिटनच्या कोर्टात अपील केली होती.
Excellent information
Thank You !