अग्गं बाई सासूबाईचा पार्ट २ लवकरच येणार.
झी मराठीवर सुरू असलेल्या मालिकांचा तर खरंच काही नेम नाही. घरातील सर्व कामे आवरून गृहिणी त्यांचा वेळ मालिका पाहण्यासाठी घालवत असतात. हा मालिकांसाठीचा वेळ म्हणजे महिला वर्गासाठी आराम टाईम असतो. सासू सुनेचे भांडण तर कधी भावजी पैठणी घेऊन दारात येतात. तर कुठे एखादी प्रेमकहाणी पाहायला मिळते. महिला वर्ग तर या मालिकांमध्ये पूर्ण गुंग होऊन जातात.
या झी मराठीवर आता नवीन मालिका सुरू होणार आहे. परंतू सध्या खूपच चर्चेत असलेली मालिका ‘अग्गं बाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण त्या ऐवजी ‘अग्गं बाई सुनबाई’ ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे. आता पर्यंत अग्गं बाई सासूबाई ही सीरिअल गृहिणींची फारच आवडती होती. यामध्ये शुभ्रा नावाच्या मुलीची भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान हिची भूमिका सर्वांना भारावून टाकणारी होती. या मालिकेला भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर अग्गं बाई सुनबाई या मालिकेला सुद्धा तेवढा प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.
अगं बाई सासूबाई या मालिकेमध्ये बबड्या, शुभ्रा, आसावरी, अभिजित राजे, आजोबा या सगळ्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतात. या मालिकेचे कथानक सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिके ऐवजी आता याच मालिकेचा दुसरा पार्ट म्हणून आपल्या समोर येणार आहे. तो पार्ट म्हणजेच अग्गं बाई सुनबाई असणार आहे. यामध्ये आसावरी म्हणजेच निवेदिता सराफ, अभिजित म्हणजेच गिरीश ओक असणार आहे. मात्र शुभ्रा ही भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान या मालिकेमध्ये नसणार आहे. त्या ऐवजी उमा पेंढारकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उमा पेंढारकरने या पूर्वी स्वामिनी मालिकेत पार्वतीबाईची भूमिका साकारली होती. आता अग्गं बाई सासूबाई प्रमाणेच अग्गं बाई सुनबाईला प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळतोय, हे बघायला मिळेल.