डिंडा भाजपा तर मनोज तिवारी तृणमूलच्या संघात सामील.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केल्याचे बुधवारी पाहायला मिळालं. भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याच्यानंतर गोलंदाज अशोक डिंडा यांनी राजकारणात प्रवेश केला. फलंदाज मनोज तिवारी यांना सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तर अशोक डिंडानं भाजपात प्रवेश केला.
दुसरीकडे फलंदाज मनोज तिवारी यानंही बंगालच्या सिनेस्टारसह तृणमुल काँग्रेसचा हात पकडला.