हिटलरनेदेखील स्टेडियमला स्वतःचे नाव दिले होते”- जितेंद्र आव्हाड
ट्विटच्या माध्यमातुन साधला पंतप्रधानावर निशाना.
अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात आले आहे.यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.त्यामुळे,आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे.
या नामांतरावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत मोदींची तुलना हिटलर सोबत केली आहे.याबाबत आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे.ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की,”स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”.