देवेंद्र फडणवीस यांच्यावर बंगालची जबाबदारी ..!
डायमंड हार्बर येथे झालेल्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा मोठी जबाबदारी आहे, गेल्या काही महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात येणार असं बोललं जात होत.
पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारातही देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी देण्यात आली आहे, त्याचसाठी सोमवारी देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगालमध्ये पोहचले, याठिकाणी त्यांनी परिवर्तन यात्रेला सुरू केली. फडणवीसांनी त्यांच्या ट्विटरवर काही फोटो शेअर केलेत, त्यात पश्चिम बंगालमधील सतगाचिया विधानसभा मतदारसंघात अम्तालापासून परिवर्तन रॅली सुरू केल्याची माहिती दिली, यावेळी पश्चिम बंगालच्या जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रेम आणि स्नेह बघायला मिळत असल्याचं ते म्हणाले.
यंदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन निश्चित आहे, ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, याठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी परिवर्तन यात्रेवेळी व्यक्त केला, डायमंड हार्बर येथे झालेल्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा पहिला दौरा केला, नौपारा ते दक्षिणेश्वरपर्यंत मेट्रो योजनेसह महत्त्वपूर्ण कामांचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, या सर्व योजना पश्चिम बंगालच्या त्या भागाशी जोडल्या आहेत, जिथे कोळसा उद्योग, स्टील उद्योग उत्पादन केले जाते, नव्या वाहतूक सेवेमुळे अनेक उद्योगांना चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.