स्पोर्ट्स

पंजाबवर विजय मिळवुन हैदराबादने उघडले खाते

आयपीएलच्या १४व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने पहिल्या विजयाची नोंद केली. आज झालेल्या लढतीत त्यांनी पंजाब किंग्जचा ९ विकेटनी विजय मिळवला. पहिल्या तीन लढतीत पराभव झाल्याने हैदराबादला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते. पंजाबने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी दिलेले १२१ धावांचे लक्ष्य हैदराबादने १९व्या षटकात पार केले. हैदराबादच्या शानदार गोलंदाजीपुढे पंजाबचा डाव १२० धावात संपुष्ठात आला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांनी संघाला चांगली सुरूवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १०.१ षटकात ७३ धावा केल्या. वॉर्नर ३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर केन विलियमसनने बेयरस्टोसह विजयाची औपचारिकता पूर्ण केली. हैदराबादकडून बेयरस्टोने नाबाद ६३ आणि विलियमसनने नाबाद १६ धावा केल्या. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पंजाबच्या अंगलट आला. पहिल्याच ओव्हरमध्ये राशिद खाने कॅच सोडला. पण त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने राहुलचा बाद केले. त्याने चार धावा केल्या. त्यानंतर सातव्या षटकात खलील अहमदने दुसरा सलमीवीर मयांक अग्रवालला २२ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात निकोलस पुरन शून्यावर बाद झाला. यामुळे पंजाबची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. मैदानावर असेलल्या ख्रिस गेल आणि दीपक हुड्डा यांच्यावर सर्व मदार असताना राशिद खानने गेलचा अडथळा दूर केला. गेलने १५ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माने दीपक हुड्डाला १३ धावांवर माघारी पाठवले. पंजाबचा निम्मा संघ ६३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या सामन्यात पदार्पण करणारा मोसेस हेनरिक्स १४ वर बाद करत अभिषेकने आणखी एक विकेट घेतली. अखेरच्या काही षटकात शाहरुख खानने धावांचा वेग वाढवला. पण १९व्या षटकात तो २२ धावांवर बाद झाला. पंजाबने २० षटकात १२० धावा केल्या. हैदराबादकडून खलीद अहमदने ३, अभिषेक शर्माने दोन, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *