दिल्लीची भरारी पंजाबच्या जिव्हारी;१९५ चे आव्हान लिलया पेलले
धवनची ९२ धावांंची ताबडतोड खेळी
दिल्लीने नाणेफेक जिंकून यावेळी पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले.
पण दिल्लीचा हा निर्णय चुकीचा असल्याचे मयांक आणि लोकेश यांनी दाखवून दिले.
कारण मयांकने सुरुवातीपासूनच दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली.
यावेळी लोकेशपेक्षा मयाक हा अधिक आक्रमकपणे फलंदाजी करत होता.
मयांकच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर पंजाबच्या संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५९ धावा करता आल्या.
मयांकने यावेळी फक्त २५ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. मयांकचे या हंगामातील हे पहिले अर्धशतक ठरले.
अर्धशतक झळकावल्यावरही मयांक फटकेबाजी करत होता. पण यावेळी एक मोठा फटका मारताना मयांक बाद झाला.
मयांकने यावेळी ३६ चेंडूंत सात चौकार आणि चार षटाकारांच्या जोरावर ६९ धावांची तडफदार खेळी साकारली.
मयांक बाद झाल्यावर राहुलने यावेळी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि जोरदार फटकेबाजी केली.
लोकेशने यावेळी आपले अर्धशतकही साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर राहुलला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही.
दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या नादात राहुलले आपली विकेट गमावली.
राहुलने यावेळी ५१ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. मयांक बाद झाल्यावर संघाची भिस्त ख्रिस गेल आणि दीपक हुडा यांच्यावर होती.
फलंदाजीला आल्यावर पहिल्याच चेंडूवर हुडाने यावेळी षटकार लगावला आणि दिमाखात सुरुवात केली.
गेलने यावेळी आक्रमक फलंदाजी केली खरी, पण त्याला फक्त १० धावांवर समाधान मानावे लागले.
गेल बाद झाल्यावर निकोलस पुरन फलंदाजीला आला, पण त्याला यावेळी फकत ९ धावांवर समाधान मानावे लागले.
पण त्यावेळी दीपक हुडा मात्र चांगल्या लयीत दिसत होता आणि जोरजार फटकेबाजी करत होता.
पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लाने 18.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 198 धावा केल्या.
दिल्लीकडून शिखर धवनने 92 धावांची शानदार खेळी केली. तर पृथ्वी शॉने 32 धावा केल्या. तर मार्क्स स्टोयिनसने नाबाद 27 धावांची खेळी केली.