पॉलिटीक्समहाराष्ट्र

खरचं हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे?: जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट कवितेतून भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. करोना संसर्गामुळं राज्यात संचारबंदी लागू केली आहे.

यावरुन भाजप नेत्यांनी सरकारला घेरलं आहे. भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आव्हाडांनी थेट कवितेचा मार्ग निवडला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रात्री 8 वाजेपासून पुढचे 15 दिवस राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत तसेच विविध घटकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात केले आहे.

या पॅकेजवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’, असं शीर्षक असलेली कविता फेसबुकवर पोस्ट केली आहे.

आव्हाडांनी उपरोधित शैलीत ही कविता लिहली असून भाजपच्या नेत्यांना टोला हाणला आहे.

ही कविता फेसबुकवर शेअर करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

वाचा ही कविता!

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

कधी थाळ्या वाजवायला

लावल्या नाही.

ना कधी मेणबत्या आणि दिवे

लावायला लावले .

निर्णय घेताना घेतले

विश्‍वासात.

विरोधकांचे त्यामुळेच

फावले..

शांत राहून तो लढत आहे

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

मंदिर उघडा, बाजार उघडा

शाळा उघडा ते म्हणाले.

परीक्षा पुढे ढकलल्या तर

ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले.

कोरोना वाढला तर ते आता

फक्त सरकारला दोषी ठरवत आहे.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

इमान तर विकले नाहीच

ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या.

कोरोनाचे आकडे लपवले नाहीच

खोट्याने न कधी माना झुकल्या.

घरी पत्नी आणि मुलगा

आजारी असतांना तो मात्र लढत आहे.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

ना कुठे बडबोलेपणा

ना कशाचा बडेजाव..

आठ हजार कोटीचे

विमान नको.

ना कोणत्या प्रकरणात

घुमजाव..

जे करतोय ते प्रामाणिकपणे

तो करतो आहे.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

व्यापार्‍यांचे ऐकून घेतोय.

विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय.

गोरगरीब जनतेला

एकवेळ शिवभोजन मोफत देतोय.

निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकट

शेतकर्‍यांच्या अडचणी

साठी तो शांततेत लढतो आहे ..

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

ना क्लीन चिट देता आली.

ना खोटी आकडे वारी देता आली.

निवडणूक काळात तर कधी

ना अशक्य घोषणा त्याला करता आली.

जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊन

निधी पंतप्रधान निधीला ते देताय.

उठसूठ, सकाळ संध्याकाळ

ते टीका सरकार वर करताय.

तो मात्र टिकेला उत्तर न देता

सर्वसामान्यांसाठी झटत आहे.

विरोधकांचे खरंच राईट आहे.

खरंच.हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.!!

  • . गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *