वनडे रँकिंगमध्ये मध्ये बाबर आझम प्रथम स्थानी
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विराटला पछाडत आयसीसी वनडे रॅंकिंगमधील पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे विराटसाठी हा जबरदस्त धक्का समजला जात आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे रॅंकिगमध्ये बाबरने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. त्यामुळे विराटची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. विराट गेल्या काही महिन्यांपासून अग्रस्थानी कायम होता. मात्र बाबरने विराटला पछाडत पहिलं स्थान पटकावलं. बाबरच्या नावावर एकूण 865 रेटिंग्स पॉइंट्सची नोंद आहे. तर विराटच्या नावावर 857 गुण आहेत. म्हणजेच या दोघांमध्ये अवघ्या 8 पॉइंट्सचा फरक आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहित 825 पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर 801 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच 791 पॉइंट्ससह पाचव्या स्थानावर विराजमान आहे. टॉप 10 मध्ये विराट आणि रोहित व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही. एवढंच नव्हे तर वनडे रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर आल्या त्याच दिवशी टी20 क्रिकेट मध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध शतक देखील ठोकल. बाबर आझम ने केवळ 59 चेंडूत 122 धावा काढल्या यात 15 चौकार आणि 4 षटकार चा ही समावेश होता.
कोण आहे बाबर आझम ?
बाबर आझम हा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. उजव्या हाताचा वरचा फळी चा फलंदाज असलेला आझम हा जगातील सर्वोत्तम समकालीन फलंदाजांपैकी एक आहे.तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्जकडून खेळतो. मे 2015 मध्ये, बाबरला झिम्बाब्वेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी पाकिस्तानी एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले. मे २०२० मध्ये त्याची एकदिवसीय कर्णधार म्हणूनही नियुक्ती झाली. जून २०२० मध्ये, तीन कसोटी आणि तीन टी -२० सामन्यांसाठी पाकिस्तानच्या इंग्लंड दौर्यासाठी 29 लोकांच्या संघात टी -२० संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आले. बाबरने 19 आंतरराष्ट्रीय शतके, कसोटी सामन्यात 5 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 13 आणि टी -20 मध्ये 1 शतक आहेत. बाबर चे टेस्ट मध्ये 2167 वनडे मध्ये 3808 तर टी20 मध्ये 1920 धावा आहेत.