सोनम आणि अंशू मलिक ऑलिम्पिक साठी पात्र
शानदार कामगिरी बजावताना भारताच्या युवा कुस्तीपटू अंशु मलिक आणि सोनम मलिक यांनी शनिवारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता गटात रौप्य पदक जिंकून टोकियो गेम्ससाठी पात्रता मिळवली. १९ वर्षीय अंशु आणि १८ वर्षीय सोनम यांनी कनिष्ठ ते वरिष्ठ सर्किटमध्ये लौकर प्रगती केली. उपांत्य फेरीत सोनम ६-० ने पिछाडीवर होती त्या तप्यातून तीनी जबरदस्त परती करत सामना ९-६ ने जिंकला. तर अंशू ने तिच्या प्रतिस्पर्धी ला जिंक्याची एकही संधी दिली नाही. अंतिम फेरी पर्यंत तिने फक्त २ गुण गमावले होते.ह्या पत्रते सह ऑलिम्पिक साठी पात्र होणाऱ्या त्या दुसऱ्या व तिसऱ्या महिला झाल्या. विनेशने यापूर्वीच २०१२ वर्ल्ड चॅम्पियनशिपद्वारे पात्रता मिळविली होती. विनेष फोघाट हीच्याकधून पदकाची अपेक्षा केली जात आहे. एकूणच, आता भारताकडे साहा पैलवान आहेत ज्यांनी आगामी खेळांसाठी पात्रता मिळवली आहे. पुरुषांपैकी बजरंग पुनिया (65 किलो), रवी दहिया ( 57 किलो) आणि दीपक पुनिया ( 86 किलो) यांनी पुरुषांच्या फ्री स्टाईल स्पर्धेत पात्रता मिळविली आहे.परंतु, मागच्या ऑलिम्पिक ची कांस्यपदक विजेती साक्षी मलिक चे ऑलिम्पिक ला पात्र होण्याचे दरवाजे बंद झाले आहेत. अंशू मलिक च्या पत्राते मुळे ५७ किलो गटात आता भारताला कोटा मिळणार नसल्याने साक्षी मलिक चे ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याचे दरवाजे बंद झाले. भारताच्या ३ महिला कुस्तीपटू टोकियो साठी पात्र झाले आहेत तसेच मे महिन्याच्या अंतिम तारीख परंत पात्रता फेरी सुरू असतील. ह्या स्पर्धेतून भारताला अजुन कुस्तीपटू पात्र होण्याची अपेक्षा असेल.