सोन्याची अंगठी केवळ दागिना नाही
कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर काही जणांना एखादी अंगठी परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, काही अंगठ्या परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या अंगठ्या धारण केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते. तसेच आरोग्यही उत्तम राहत, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. याशिवाय कुंडलीतील काही ग्रह-नक्षत्र कमकुवत असतील, तर त्यांची स्थिती सुधारण्यासाठीही या अंगठ्या सहाय्यभूत ठरतात.
अनेक लोक बोटामध्ये सोन्याची अंगठी अवश्य घालतात. सामान्यतः हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी अंगठी घातली जाते. सोनं बहुमूल्य धातू असून याची चमकही तेवढीच आहे. यामुळे सोन्याचे दागिने घालण्याचा मोह प्रत्येकाला असतो. सोन्याची अंगठी केवळ एक दागिना नसून हे ज्योतिष शास्त्रामध्ये सौभाग्य वाढवणे मानले जाते.
- सोनं गुरु ग्रहाशी संबंधित धातू आहे. सोन्याची अंगठी घातल्याने कुंडलीत गुरु ग्रहाचे बळ वाढू शकते.
- सोन्याची अंगठी इंडेक्स फिंगर म्हणजे तर्जनी बोटात घालणे अत्यंत शुभ राहते.
- सोन्याची अंगठी धारण केली असेल तर नशेपासून दूर राहावे. हे गुरूचा धातू आहे. हे धारण करून नशा केल्यास गुरु ग्रह अशुभ फळ देतो.
- इंडेक्स फिंगरमध्ये सोन्याच्या अंगठीत पुष्कराज धारण करावा. लक्षात ठेवा, पुष्कराज धारण करण्यापूर्वी एखाद्या ज्योतिषाकडून कुंडली अवश्य दाखवून घ्यावी.
- जे लोक लठ्ठपणाने त्रस्त असतील त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये. गुरु ग्रहामुळे ही समस्या आणखी वाढू शकते.
- सोन्याची अंगठी डाव्या हातामध्ये घालू नये. ही अंगठी उजव्या हाताच्या बोटामध्ये घालणे जास्त शुभ मानले जाते.
- लक्षात ठेवा, सोन्याची अंगठी हरवणे अपशकुन मानला जातो. यामुळे या बाबतीत नेहमी सावध राहावे.
- आयुर्वेदानुसार सोनं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे धारण केल्याने तेच लाभ मिळतात जे स्वर्ण भस्म सेवन केल्याने मिळतात.
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी अशुभ असल्यास त्याने सोन्याची अंगठी घालू नये. अन्यथा नुकसान होऊ शकते.
- सोनं धारण केल्याने आकर्षण वाढते. सोनं आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. अंगठी नेहमी शरीराच्या संपर्कात राहते, यामुळे त्वचेची चमक वाढते.