वॉल स्ट्रीट न्यूयॉर्कचे व्यापारी बील ह्वांग यांनी २ दिवसात गमावली सर्व संपत्ती
शेअर मार्केट मध्ये चुकीच्या प्रकारे गुंतवणूक केल्याचा परिणाम
वॉल स्ट्रीटचा व्यापारी बिल ह्वांग स्टॉक मार्केटमधील जगातील एकमेव व्यक्ती म्हणून गणला जात होता. तब्बल २००० दशलक्ष डॉलर्स (सुमारे दीड लाख कोटी रुपये) नेट वर्थचा मालक ह्वांगने केवळ दोन दिवसात संपूर्ण मालमत्ता गमावली. यामुळे केवळ त्यांनाच नाही तर ज्यांनी त्यांना कर्ज दिले,ज्यांच्या पैशाने त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली, अशा सर्वांना देखील ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.यात प्रामुख्याने ह्वांग यांना कर्ज देणाऱ्या क्रेडिट सुईस ग्रुप एजीला ३५ हजार कोटी रुपयांचे तर होल्डिंग्जला १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.
या संस्थेतील अनेक टॉप एक्झिक्युटिव्हजच्या नोकऱ्या देखील गेल्या.एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सेक्युरीटिज अँड एक्सचेंज कमीशनने ह्वांग् यांच्या अर्चेगोस कंपनी विरुद्ध चौकशी सुरू केली आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,ह्वांगने चुकीची गुंतवणूक केली होती, ज्याचा त्यांना इतका मोठा फटका सहन करावा लागला. तसे पाहिले तर संपूर्ण जगात बहुतांश उद्योगपतींचा पैसा उद्योग,रिअल इस्टेट, एक्विटी बाजार, आर्टवर्क यासारख्या बाबीत गुंतला आहे.मात्र बील हवांग् यांचा सर्व पैसा शेअर मार्केट मध्ये होता. त्यामुळे शेअर्सचे भाव पडल्यावर त्यांची संपत्ती बुडाली.त्यांची कंपनी ढासळल्यामुळे बर्याच बँका आणि वित्तीय संस्थांची अवस्थाही खराब झाली आहे. बँकेने तारण ठेवलेल्या ह्वांगचे शेअर्स विकण्यास सुरुवात केली आहे.
ह्वांगची कंपनी, आर्चेगस कॅपिटल मॅनेजमेन्ट, मार्चमध्ये आर्थिक इतिहासामधील सर्वात मोठी अपयशी ठरली आहे. कारण इतक्या मोठ्या संख्येने कोणत्याही व्यक्तीलने आपली मालमत्ता गमावली नाही.असे म्हणतात की जेव्हा ह्वांग त्याच्या शिखरावर होते तेव्हा त्यांची संपत्ती सुमारे ३००० कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे २.२ लाख कोटी भारतीय रुपये होती.
ते छद्य या नावाने गुंतवणूकीची सुविधा उपलब्ध करून देत असत आणि कंपनीच्या नावाने ह्वांग यांनी बँकांकडून अरब डॉलर कर्ज घेतले होते.त्यांनी आपले सर्व पैसे काही कंपन्यांमध्ये ठेवले होते ज्यात वायाकॉम, सीबीएस, जीएसएक्स, टेकेडू आणि शेपे या कंपन्यांचा समावेश होता.
याशिवाय ह्वांग यांच्यावर अंतर्गत व्यापाराचाही आरोप आहे. त्यांनी २००८ साली टायगर एशिया नावाचा हेज फंड सुरू केला. ज्याद्वारे ते उसने घेतलेल्या पैशातून एशिया च्या वेगवेगळ्या राज्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक ठेवत असे. परंतु, इन्साईडर ट्रेडिंगचे आरोप लागल्यानंतर त्यांना गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावे लागले होते. पाच वर्षांसाठी सार्वजनिक पैशाचे व्यवस्थापन करण्यासदेखील त्यांच्यावर बंदी होती. ते बंद झाल्यानंतर त्यांनी अर्चेगस ही कंपनी सुरू केली, ज्याची स्थिती आज सर्वांसमोर आहे.