उन्हाळ्यात उकड्यापासून वाचायचं असेल तर सब्जा बीजाचे पाणी पिणे फायदेकरक
उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी प्या सब्जा बी चे पाणी, ह्या सब्जा मुळे शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी मदत होती आणि शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्हाला सब्जाचे पाणी (Basil Seed Water) पिणे खूप फायद्याचे ठरेल.
उन्हाळा म्हटला की उकाडा आलाच,त्यात घामाच्या धारा वाहणे हे देखील साहजिकच …हा उन्हाळा ऋतू आपल्याला कोणाला जास्त आवडत नाही कारण तापमानात वाढ झाल्याने सूर्य देखील उष्ण आग ओकत असतो. ज्यामुळे खूपच गरमी जाणवते. ज्याचा परिणाम आपल्या मानवी शरीरावर होते. अशा वातावरणामुळे आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच शरीरातील तापमान नियंत्रित ठेवणे याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे. यात शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्हाला सब्जाचे पाणी (Basil Seed Water) पिणे खूप फायद्याचे ठरेल.
सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिफ अॅसिड तसेच अनेक पोषक घटक असतात. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे उन्हाळ्यात सब्जाचे पाणी आर्वजून प्यावे. फक्त ते पिताना ते अति प्रमाणात देखील पिऊ नये. उन्हातून बाहेर आल्यानंतर त्वरित पाणे कधीही चांगले. जाणून घेऊया साबणाच्या पाण्याचे काही उपयोग आणि फायदे
1. उन्हातून घरी आल्यानंतर सब्जाचे पाणी प्यावे यामुळे उन्हाचा दाह कमी होईल.
2. जर तुम्हाला युरिनसंबंधी काही तक्रारी असेल किंवा तुम्हाला उन्हाळ्या (सतत लघवी होणे) लागत असेल तर सब्जाचे पाणी प्यावे.
3. अंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या पिटीका येणे, नाकातून रक्त येत असेल तर सब्जाचे पाणी प्यावे.
4. पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी सब्जा गुणकारी ठरतो.
5. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरातील टॉक्सिन दूर होतात.
थोडक्यात उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचे पाणी पिल्यावर कधीही चांगले असतेच. सब्जा शक्यतो साध्या पाण्यात मिसळावा. सब्जाचे पाणी फ्रिजमध्ये ठेवून ते पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते. सब्जा हा मुळात थंड असल्याने त्याचे पाणी पिणे शरीरास थंडावा देणारच ठरेल.