कोविड सेंटरमधून परिक्षा देण्यास कोरोनाबाधित विद्यार्थी परिक्षा केंद्रावर
विद्यार्थी पळाले,केंद्रावर सावळागोंधळ
परीक्षा देत असलेला एक विद्यार्थी कोरोना बाधित आहे. आणि तो थेट कोरोना सेंटरमधून आला आहे. तशी माहिती प्रतिष्ठान महाविद्यालयात मिळताच केंद्रात मोठा गोंधळ उडाला. अन्य विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. अखेर पोलिसांनी येऊन कोरोना बाधित विद्यार्थ्यांचा शोध घेतला. तेव्हा तो विद्यार्थी साधा मास्क घालून अन्य विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देत असल्याची गंभीर बाब समोर आली. यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालकांनी केलेली आहे.
पदवी परीक्षेचा बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. प्रतिष्ठान महाविद्यालयात १४५५ विद्यार्थी हजर होते. परीक्षा सुरू होऊन अर्धा तास होत नाही तोच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेला विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती महाविद्यालयाच्या मुख्य लिपिक इम्रान पठाण यांना मिळाली. महाविद्यालय प्रशासनाने त्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला. आणि ही वार्ता वाऱ्यासारखी परीक्षा केंद्रात पसरल्याने गोंधळ उडाला पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर पवार उपनिरीक्षक रामकृष्ण सांगळे, छोटू सिंग गिरासे यांना कॉल सेंटरशी संपर्क साधून सादर सदर रुग्णाचे नाव घेतले. शोध घेतल्यावर स्वरूप सदर रुग्ण शांतपणे परीक्षा देताना सापडला लगेच त्याला तिथून उठून वेगळी व्यवस्था केली गेली.