इंटरटेनमेंट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार भूषण प्रधान

छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट, मालिका आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेली एक मालिका चांगलीच गाजली होती.

या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आपल्याला छत्रपतींच्या भूमिकेत दिसले होते.

आता पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर छत्रपतींच्या आयुष्यावर मालिका येत असून या मालिकेत भूषण प्रधान  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

छत्रपति शिवाजी महाराज हे नाव अजरामर झाले आहे जोपर्यंत या धर्तीवर जीवन असेल तोपर्यंत शिवाजी महाराजांचा नाव राहील.

हे नाव उच्चारलं तरी ऊर अभिमानाने भरून येतो रयतेचा राजा कसा असावा याचा पाया छत्रपतींनी रचला.

आणि या जाणत्या राजांच्या स्थापनेच्या स्वप्नपूर्तीसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला.

याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगनारी जय भवानी जय शिवाजी मालिका 2 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वर सुरू होत आहे.

ही मालिका नेताजी पालकर बाजीप्रभू देशपांडे शिवा काशिद जिवा महाला तानाजी मालुसरे आदि लढवय्यांच्या शौर्याला अर्पण असेल

अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. भूषण म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्यांचा स्वप्न असतं.

भुषणने त्याच्या मालिकेचा उल्लेख केला नसला तरी मी आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमाकडे वळत असून

मी त्यासाठी खूपच उत्सुक आहे असे त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते.

आता त्याने इन्स्टास्टोरीत जय भवानी जय शिवाजी या मालिकेतील त्याचा फोटो पोस्ट केला आहे. 

या चित्रपटात तो अभिनेत्री रायमा सेनसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

आठ वर्षांनंतर भूषण छोट्या पडद्यावर परतत आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *