देश-विदेशपॉलिटीक्स

एन व्ही रमणा नवे सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे लवकरच सेवा निवृत्त होणारआहे. नवीन सरन्यायाधीश पदाची नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली होती.

त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी शिफारस नाव मागविण्यात आलं होतं.

त्यानंतर सरन्यायाधाशी बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली होती.

४८ व्या सरन्यायाधीशपदी रमणा विराजमान होणार

सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश असलेले नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी मंगळवारी नेमणूक करण्यात आली आहे.

जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार न्या. रमणा हे देशाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून २४ एप्रिलला शपथ घेणार आहेत.

रमणा हे २६ ऑगस्ट २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत. अधिसूचनेत म्हटले आहे की, अनुच्छेद १२४ मधील दुसऱ्या कलमानुसार राज्यघटनेने दिलेल्या

अधिकारांतर्गत न्या. नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी २४ एप्रिल २०२१ पासून नियुक्ती करण्यात येत आहे.

पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा व कायदा मंत्रालयाचे सचिव बरुण मिश्रा यांनी राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले नियुक्तीपत्र रमणा यांना दिले आहे .

कोण आहेत नथुलापती वेंकट रमणा :

आंध्रप्रदेश येथील पोन्नावरम या छोट्याशा गावात त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला.

१० एप्रिल १९८३ पासून ते वकिली क्षेत्रात आले. त्याआधी आंध्रप्रदेश येथे त्यांनी २ वर्षे एका वृत्तपत्रात काम केले होते.

रमणा यांचे बी.एस्सी , बी.एल शिक्षण झाले असून फौजदारी आणि संविधान आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांचं स्पेशालयझेशन झालं आहे.

२ सप्टेंबर २०१३ रोजी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. नंतर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.

रमणा यांनी आजपर्यंत अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली असून अनुच्छेद ३७० च्या घटनात्मक वैधतेवर नेमलेल्या पाच सदस्यांच्या घटनापीठात त्यांचा समावेश होता.

त्या वेळी हे प्रकरण सात सदस्यांच्या न्यायपीठाकडे देण्यास घटनापीठाने नकार दिला होता.

नंतर आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात २७ जानेवारी २०२० रोजी न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. काही काळ ते आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश होते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *