चालाक रनआऊटसाठी क्विंटन डिकॉकला आयसीसीने लावला दंड
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर फलंदाज क्विंटन डिकॉकने पाकिस्तानी फलंदाज फकर झमानला
गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सकडे भलता इशारा केला.
त्यामुळे झमानला तंबूत जावं लागलं. डिकॉकच्या चिडक्या खेळीवर सगळीकडून टीका होत असताना आता आयसीसीने देखील डिकॉकला इंगा दाखवलाय.
डिकॉकच्या फेक फिल्डिंगमुळे त्याला तसंच दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला आयसीसीने दंड ठोठावला आहे.
डिकॉकच्या मॅच फीसच्या ७५ टक्के रक्कम कापण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.
तर दक्षिण आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमा यांच्या मॅचमधून २० टक्के रक्कम कापण्याचा आयसीसीने निर्णय घेतला आहे.
तर फकर झमान ला आयसीसीने हॉल ऑफ फ्रेममध्ये देखील शामिल केले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात चालू असलेल्या ३ सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघाने एक-एक सामना जिंकला आहे .
परंतु आता होणा-या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे काही प्रमुख खेळाडू खेळणार नाही आहे ते आयपीएल साठी भारतात आलेले आहेत.