आज कुंभमेळ्यात स्नानाचे विशेष महत्त्व,आता शुभकार्य सुरू करण्याचा सर्वोत्तम काळ
शासकीय घोषणेनुसार हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्याची सुरूवात एक एप्रिलला झाली आहे, पण ज्योतिषी गणनेनुसार कुंभ मेळ्याची सुरूवात सहा एप्रिल पासून होईल.
कुंभमेळ्यासाठी संतांचा मेळा मकर संक्रांति पासूनच येण्यास सुरुवात होते. आणि महाशिवरात्रीला पहिले शाही स्नान हि मानले जाते.
पण ज्योतिषी गणनेनुसार जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशी प्रवेश करतो, तेव्हाच कुंभमेळ्याची सुरुवात होते, बारा वर्षांत एकदा होणारा हा योग सहा एप्रिलला होणार आहे .
याच दिवसापासून कुंभमेळा सुरू होतो अशी मान्यता आहे.
कुंभमेळ्याच्या प्रारंभीच्या तिथी बाबत संत समाजातील वेगवेगळ्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, मकर संक्रांति पासून साधुसंत कुंभमेळा सुरू होण्याची प्रतीक्षा करतात.
शिवरात्र हा त्याचा मोठा टप्पा मानला जातो, पण ग्रहांचा दुर्लभ योग होतो. तेव्हाच कुंभमेळ्याची सुरुवात होते.
गुरूला कुंभ राशीतून निघून पुन्हा त्याच राशीत प्रवेश करण्यास अकरा वर्ष अकरा महीने आणि सत्तावीस दिवस लागतात, त्यामुळेच कुंभमेळा बारा वर्षांनी होतो .
कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर ज्योतिष गणनेत शनिदेवाला कुंभ राशीचा स्वामी मानले जाते.
शनीला कर्म आणि लाभाचे प्रतीक मानले जाते, तर गुरूला भाग्य आणि मोक्षाचे भाग्य कर्म आणि लाभ यांच्यात संतुलन असेल तेव्हाच व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते.
अशी सनातन धर्मात मान्यता आहे. गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभमेळा सुरू होतो म्हणजे राशी स्वामी शनी व गुरु दोघांचा प्रभाव असतो.
त्यामुळेच कुंभमेळ्यादरम्यान मोक्षप्राप्तीची शक्यता सर्वाधिक असते अशी मान्यता आहे. या काळात गुरूच्या प्रभावामुळे व्यक्तीची पाप करण्याची क्षमता क्षीण होते
आणि तो सत्कर्मासाठी प्रेरित होतो. त्यामुळे या काळाला शुभ कार्य सुरू करण्याचा उत्तम काळ मानले आहे.
हरिद्वार : जेव्हा गुरु कुंभ राशीत येतो व सूर्य मेष राशीत प्रवेश करून उच्चीचा होतो तेव्हा पूर्ण कुंभमेळा होतो. १३ एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे.
प्रयाग : जेव्हा गुरु मकर राशित व सूर्य मेष राशीत असतो तेव्हा कुंभमेळा होतो. उज्जैनच्या कुंभासाठी सूर्याचा मेष राशीत व नाशिकसाठी सूर्याचा सिंह राशीत प्रवेश आवश्यक आहे
या दोघांना सिहस्थ म्हणतात.