अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण
कोरोना महामारीच्या विलख्यातून कोणीच सुटले नाही . यात अनेक अभिनेता , अभिनेत्री आणि राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले .
देश आणि जगात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यामध्ये आता अभिनेत्री कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे.
त्यांनी इन्स्टाग्राम स्टेट्सच्या माध्यमातून ही माहिती दिली.
अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. मी त्वरित स्वत: ला क्वारंटाईन केले आहे .
ती म्हणाली, “मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. मी माझ्या संपर्कातील सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांची त्वरित चाचणी घ्या.
आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. सुरक्षित राहा आणि स्वत: ची काळजी घ्या. गेल्या काही दिवसांत, अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली.
अलिकडच्या काळात अक्षय कुमार, आमिर खान, आलिया भट्ट, आर माधवन, रणबीर कपूर, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गायक आदित्य नारायण
अभिनेत्री भूमी पेडणकर, विक्की कौशल, विनोदकार कुणाल कामरा आणि शशांक खेतान यांना बाधा झाली आहे.
बॉलिवूडमध्ये देखील आता कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. इतकंच नाही तर अनेक टीव्ही सेलिब्रिटींना देखील कोरोनाची लागण झाली आहे.