आयपीएल वर कोरोनाचा प्रादुर्भाव
आयपीएलच्या 14 व्या हंगामाला केवळ पाच दिवस शिल्लक आहेत, पण या लीगवरील कोरोनाचा धोका संपण्याचं नाव घेत नाही.
चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघालादेखील कोरोनाचा फटका बसला आहे.
आरसीबीचा स्टार युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे देवदत्तला उर्वरित संघापासून वेगळे करत आयसोलेट करण्यात आले आहे. आरसीबीचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळवला जाणार आहे.
हा सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. पण आता देवदत्तचे त्या सामन्यात खेळणे कठीण झाले आहे.
आयपीएलच्या गेल्या हंगामात देवदत्त आरसीबीसाठी एक मोठा स्टार खेळाडू म्हणून समोर आला होता.
टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना त्याने चमकदार कामगिरी केली होती. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात देवदत्तचा मोठा वाटा होता.
त्याला कोरोनाची लागण झाल्याने संघासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे.
अक्षर पटेलदेखील कोरोनाबाधितदरम्यान, काल (3 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपला पहिला सामना 10 एप्रिल रोजी मुंबईत खेळणार आहे.
त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाचा कोरोनो रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता.
परंतु त्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या संघात सहभागी झाला आहे.