वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील रणसंग्राम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. सगळ्या संघाचे ट्रेनिंग कॅम्प सुरु आहेत.
संघ व्यवस्थापन आणि मार्गदर्शक मंडळ प्रतिस्पर्धी संघाला कशी मात द्यायची यासंबंधी रणनिती आखण्यात व्यस्त आहे.
अशातच वानखेडे स्टेडियममधून मोठी बातमी समोर येतीय. वानखेडे स्टेडियमवरच्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय.
वानखेडे मैदानावर आयपीएलच्या काही मॅेचेस खेळवण्यात येणार आहे. त्याअगोदर ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.
10 ते 25 एप्रिलपर्यंतच्या जवळपास 10 मॅचेस वानखेडे मैदानावर होणार आहे. मैदानावरच्या 19 कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर कोरोना टेस्ट करण्यात आली.
त्यापैकी 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर 10 एप्रिल रोजी पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ही लढत खेळवण्यात येणार आहे. याच मॅचची तयारी सध्या वानखेडेवर जोरदार पणे सुरु होती.
परंतु अशातच हे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन या सगळ्या प्रकरणात जातीने लक्ष ठेऊन आहे.
इंडियन प्रीमयर लीगचं यंदाचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 सामने खेळवण्यात येणार आहेत.
14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत.
या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही.
कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.