इंटरटेनमेंट

ब्लॅक अँड व्हाईटपासून ते रंगीत पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रख्यात अभिनेत्री शशिकला पडद्याआड

प्रख्यात अभिनेत्री शशिकला यांचे आज वयाच्या 88 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. नेहमी टापटीप राहणाऱ्या शशिकला या वयातही अत्यंत ग्रेसफुल दिसत असत.

हिंदी आणि मराठी सिनेमात त्यांनी यशाचं शिखर गाठलं होतं. पण त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत, कष्ट याची अनेकांना कल्पना नसेल.

शशिकला यांनी बॉलिवूडध्ये नायिका, खलनायिका, नृत्यांगना, सहनायिका, खाष्ट सासू अशा अनेक भूमिका साकारत स्वतःला तावून सुलाखून काढले होते.

4 ऑगस्ट 1932 ला मुंबईत जन्मलेल्या शशिकला यांचे सौंदर्य थक्क करणारे होते हे त्यांचे जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाहिल्यानंतर स्पष्ट होते.

बॉलीवुडमध्ये फक्त सौंदर्यच नव्हे तर मेहनत आणि नशिब या दोन्ही गोष्टींची साथ लागते आणि शशिकला यांनाही साथ चांगली मिळाली होती.

शशिकला यांचे वडील अनंतराव जवळकर श्रीमंत होते. भावाला परदेशात चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.

त्यामुळे ते लवकरच दिवाळखोरीत गेले. भावानेही परत आल्यानंतर त्यांना मदत केली नाही. त्यामुळे जवळकर कुटुंब रस्त्यावर आले.

त्यानंतर जवळकर कुटुंब मुंबईला आले आणि जगण्याचा संघर्ष करू लागले. घरची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याने शशिकला यांना पडेल ती कामे करावी लागली होती.

चित्रपटात त्यांचा प्रवेश योगायोगानेच झाला. 1945 मध्ये शशिकला यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने तोंडाला जो रंग लावला तो आजपर्यंत उतरवलेला नाही.

या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना 25 रुपये बिदागी देण्यात आली होती. ‘झीनत’नंतर सय्यद शौकत हुसैन रिझवी यांनी शशिकला यांना ‘जुगनू’ चित्रपटात अभिनेता दिलीप कुमारच्या बहिणीची भूमिका साकारण्याची संधी दिली.

1947 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.  1962 मध्ये रिलीज झालेल्या ‘आरती’ चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. 

यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांत काम केले. 

त्याच्या मुख्य चित्रपटांमध्ये ‘अनुपमा’, ‘फूल और पत्थर’, ‘मी मिलान की बेला’, ‘गुमराह’, ‘वक्त’ आणि ‘ब्यूटीफुल’ यांचा समावेश आहे.

 आपल्या कारकीर्दीत त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त, ससीकला टीव्ही शो ‘जीना ईसी का नाम है’, ‘दिल देके देखो’ आणि ‘सोनपरी’ या सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. 

2004 मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ससिकला अंतिम वेळी दिसली होती. यात त्याने सलमान खानच्या आजीची भूमिका साकारली होती.

 २००७ मध्ये चित्रपटातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.आणि 2009 ला राज्य सरकारचा व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *