पॉलिटीक्स

विक्की कौशलचा ‘सैम बहादुर’लुक वायरल

अभिनेता विक्की कौशल आज प्रत्येकाच्या हृदयात राज्य करत आहे. विक्कीचे चाहते अजूनही ‘उरी’ चित्रपटामुळे त्याच्यावर खूप प्रेम करतात. विक्कीला ‘उरी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. या चित्रपटात विक्कीने आर्मी ऑफिसर म्हणून काम केले.  विक्की कौशल आर्मी लूक मध्ये खरोखरच खूप शोभून दिसतो त्यामुळे आता विकी पुन्हा एकदा आर्मी ऑफिसर भुमिकेत प्रेक्षकांच्या समोर योणार आहे.

देशाचे महान योद्धा सॅम मानेकशॉ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बायोपिकचे नाव जाहीर करण्यात आले. यामध्ये विक्की कौशल मुख्य भूमिकेत म्हणजेच सॅम मानेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे. रॉनी स्क्रूवाला आणि मेघना गुलजार यांनी या बायोपिकला ‘सॅम बहादूर’ असे नाव दिले आहे.

सॅम हे भारतातील एक महान योद्धे होते. या चित्रपटात विक्की कौशल सॅम मानेकशॉ यांच्या भुमिकेत दिसणार आहे. ‘साम बहादूर’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. विक्की कौशलने या चित्रपटाविषयी माहिती देणारा टाइटल  व्हीडिओ आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.

या चित्रपटातील त्याचा लूक विक्कीने आधीच आपल्या चाहत्यांसमोर आणला होता. विक्कीच्या त्या वेगळ्या लूकने सर्वांना त्याच्याकडे आकर्षित केले आहे. यामध्ये तो खरोखरच खूप वेगळा आणि आकर्षक दिसत आहे.

टीझर सामायिक करताना विक्कीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर लिहिले, “माणूस. दंतकथा. बहादुर हृदय. आमचा सॅम बहादुर … फील्ड मार्शल # साममनेक्षाच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या कथेला त्याचे नाव सापडले आहे. # सामबहादूर.”
आमच्या एका महान नायकाची कहाणी उलगडण्यासाठी आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सॅम बहादूर या पदवीची घोषणा करण्यास आम्हाला आनंद झाला आहे आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो . एक महान माणूस जन्माला आला. आज आणि आम्ही त्याच्या स्मृती आणि वारसा सन्मान करण्यासाठी आमच्या सामर्थ्यात सर्व काही करण्याची आशा करतो. “

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *