भारताचा इंग्लडवर ७ धावांनी विजय; सॅम करनची एकाकी झुंज अयशस्वी
पंत आणि हार्दीकची ताबडतोब फलंदाजी
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावाले विजय मिळवत ही मालिका २-१ ने आपल्या खिशात घातली.
टॉस जिंकून इंग्लड ने प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला होता. दोन्ही संघात एक एक बदल केला होता.
भारताने कुलदीपच्या जागी नटराजनला खेळवले तर इंग्लड ने टॉम करनच्या जागी मार्क वूडला अंतिम अकरामध्ये खेळवले.
फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात शानदार झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवनया ओपनिंग जोडीने १०३ धावांची भागीदारी रचली.या दरम्यान धवनने अर्धशतक पूर्ण केलं.
भारताची धावसंख्या १०३ असताना रोहित शर्मा ३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर ६७ धावसंख्येवर शिखर धवन आऊट झाला.
धवनला आदिल रशीदने आपल्या गोलंदाजीवर कॅच आऊट केलं.विशेष म्हणजे भारताच्या पहिल्या विकेटनंतर एकामागे एक अशा दोन विकेट गेल्या.
कर्णधार विराट कोहली देखील स्वस्तात तंबूत परतला. विराट मोईन अलीच्या फिरकीचा बळी ठरला व अवघ्या सात धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही स्वस्तात तंबूत परतला.
यानंतर आलेल्या ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला. दोघांनी ९९ धावांची भागीदारी केली.
मात्र, सॅम करनला ही जोडी फोडण्यात यश आलं. सॅमच्या चेंडूवर ऋषभ झेलबाद झाला. त्याने ६२ चेंडूत ७८ धावा केल्या.
त्यानंतर हार्दिकने अर्धशतक साजरं केलं. पण पुढे बेन स्टोक्सने त्याचे स्टंप उडवले.
हार्दिकने ४४ चेंडूत ६४ धावा ठोकल्या.
यामध्ये ४ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता.
भारताने दिलेल्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली.
भुवनेश्वर कुमारने सलामीवीर जेसन रॉय व जॉनी बेयरस्टाला सुरवातीच्या षटकातच बाद करत इंग्लंडचे कंबरडे मोडले.
त्यानंतर डेव्हिड मलान आणि जॉस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, शार्दूल ठाकूरने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरवला. त्याने जोस बटलरला पायचीत करत तंबूत परत पाठवले.
यानंतर मलान आणि लिविंग्स्टोन यांनी इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनी संयमी खेळ सुरु ठेवला. पण शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर लिविंग्स्टोनही झेलबाद झाला.
त्याने ३१ चेडूत ३६ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.
मोईननंतर सॅम करनने आदिल रशीदच्या मदतीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरली.
दोघांनी अर्धशतकापेक्षाही जास्त धावांची भागीदारी केली. दरम्यान, विराटने ४० वी ओव्हर शार्दुल ठाकूरला दिली. शार्दुलने विराटचा विश्वास खरा ठरवला.
या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रशीदने फटका मारला. रशीदने मारलेला फटका विराटच्या दिशेने गेला. पण विराट आणि चेंडू यांच्यातील अंतर बरेच लांब होतं.
पण विराट आपल्या नेहमीच्या शैलीत हवेत झेपावला. चेंडूवर अचूक नजर ठेवत कॅच पकडला. यासह इंग्लंडला आठवा धक्का बसला.
रशीदने २२ चेंडूत १९ धावा केल्या. रशीद बाद झाल्यानंततर वूड आणि सॅम करन यांनी पुन्हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
करनने आपली धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली.अखेरच्या चेंडूपर्यंत सामना रोचक ठरला. सॅम करनने शेवटच्या चेंडूपर्यंत नाबाद ९५ धावा केल्या.
भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने ३ फलंदाजांना माघारी धाडत शार्दुलला चांगली साथ दिली.
तसेच टी नटराजनने १ विकेट मिळवली. नाबाद ९५ धावा करणाऱ्या सॅम करनला सामनावीर घोषित केल्या गेले तर
मालिकेत २१९ धावा करणाऱ्या जॉनी बेयरस्टोला मालिकावीर घोषित केले.