सिद्धू आणि तेजस्विनीची मिश्र दुहेरीत सुवर्ण कामगिरी
भारताचे आयएसएसएफ विश्वचषकात १३ वे सुवर्ण
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात भारतीय नेमबाजी संघाने शनिवारी आणखी दोन पदकांची कमाई केली. काल भारताने सोने आणि तर रौप्यपदक जिंकले. पण या कामगिरीचे महत्त्व हलकेसे कमी लेखलं जाईल कारण 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल मिश्र टीम स्पर्धेसाठी केवळ दोन संघ रिंगणात होते आणि हे दोन्ही ही संघ भारताचे होते. स्पर्धेतील दोन भारतीय जोडी यांच्यात सुवर्ण पदक सामना झाला. या सामन्यात 18 वर्षीय विजयवीर सिद्धू आणि 16 वर्षीय तेजस्विनी यांनी गुप्रीत सिंग आणि अभु्न्या पाटील यांना 9-1 असे पराभूत करून सुवर्ण जिंकले.
विजयवीर सिद्धूला आणखी एक पदक
शुक्रवारी भारताच्या विजयवीर सिद्धूनेही पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल फायनलमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तो एस्टोनियाच्या ओलेस्क पीटरकडून सुवर्ण पदकाच्या सामन्यात पराभूत झाला. 40-शॉट्स फायनलच्या अंतिम फेरीनंतर दोन नेमबाजांनी 26 गुणाची बरोबरी साधली होती. टाय ब्रेकर मध्ये विजयविर एकच गुण मिला शकला तर त्याचा प्रतिस्पर्धी ४ गुण घेत सुवर्णपदक पटकावले.
13 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्यपदकांसह भारत पॉइंट्स टेबल मध्ये पुढे आहे. अमेरिका 3 गोल्ड्स, 3 सिल्व्हर्स आणि 1 कांस्यपदकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विजयवीर ची कारकीर्द
विजयवीर सिद्धू २५ मीटर रपिद फायर पिस्तुल ह्या स्पर्धेत भाग घेतो.
१८ वर्षीय विजायविर हा २०१८ मध्ये ज्युनिअर गटात वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. ह्या स्पर्धेत त्याने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक ची कमाई केली आहे. सिनियर गटात हे त्याचे पदार्पण वर्ष आहे.
पहिल्याच वर्षी वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण जिंकून त्याने कमालीचा आत्मविश्वास दाखवला आहे. सध्या तो जागतिक क्रमवारीत ७ व्या स्थानी आहे आणि ऑलिम्पिक पात्रता गाठण्याचे त्याचे लक्ष आहे. ह्या कामगिरी नंतर त्याच्या टोकियो ऑलिम्पिक खेळण्याची शक्यता वाढली आहे. माय मध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत त्याचा कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.