स्पोर्ट्स

संजीव राजपूत आणि तेजस्विनी सावंतचे सुवर्ण यश

वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे १२ वे सुवर्णपदक

शुक्रवारी संजीव राजपूत आणि तेजस्विनी सावंत यांच्या जोडीने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या

५० मीटर रायफल 3 पोझिशन्स मिश्र टीम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

सुवर्ण पदकाच्या सामन्यात भारतीयांनी युक्रेनच्या सेरेय कुलिश आणि अना इलिना यांचा 31-29 असा पराभव केला आणि त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग करुन विजय मिळवला.

ह्या विजयासह भारतीयांची सुवर्णपदकाची संख्या 11 वर गेली.

सुरुवातीला राजपूत आणि सावंत 5-3 अशी आघाडी घेण्याआधी 1-3 मागे होते.
पण त्यानंतर भारतीय नेमबाजांनी आपले पहिले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला.

युक्रेनियन संघाने आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण घरच्या मैदानावर खेळत असलेल्या भारतीय जोडीनं रोमांचक अंतिम सामन्यात विजय मिळविला.

डॉ. करणीसिंग शूटिंग रेंजमध्ये यूएसएच्या टिमोथी शेरी आणि व्हर्जिनिया विरुद्ध 31-15

अशी चांगली कामगिरी करून ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर आणि सुनिधि चौहान यांनी कांस्यपदक जिंकले.

संजीव राजपूत आणि तेजस्विनी न रायफल 3-पोझिशन्समध्ये ऑलिम्पिक कोटा मिळवलेला आहे.

राजपूत चे हे तिसरी ऑलिम्पिक असेल, तर २०१० च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती सावंत हिन आपली ऑलिम्पिक पात्रतेची प्रतीक्षा संपवत पहिल्यांदाच पात्र झाली आहे.

२०१२ मध्ये झालेल्या लंडन आणि २००८ च्या बीजिंग गेम्स मध्ये राजपूत छा भारतीय संघात समावेश होता, परंतु त्याला माहित आहे की टोकियो ऑलिम्पिक मधले आव्हान वेगळे असेल

कारण ह्या स्पर्धा साठी स्पर्धकांना शूटिंग रेंज चे परीक्षण करायला केवळ ५,६ दिवसांची कालावधी मिळेल.

विजयवीरची रौप्यपदक कमाई

पुरुषांची २० मीटर जलद फायर पिस्तूल फायनल भारतासाठी महत्वाची ठरली कारण अनिश भानवालाने पदक जिंकल्यास जागतिक क्रमवारीतील ऑलिम्पिक

कोटा स्थानाचा पाठलाग केला होता. त्याने अंतिम फेरी गाठली परंतु सहा पात्रतांमध्ये ते पाचवे स्थान गाठले.

विजयवीर सिद्धूने रौप्यपदक जिंकून स्वत: ला टोकियोसाठी पात्र ठरण्याची संधी दिली.
ह्या स्पर्धेचा काल शेवटचा दिवस होता आणि आता भारतीय नेमबाज मे मध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी सराव करतील

तसेच भारताचे आतापर्यंत १५ नेमबाज ऑलिम्पिक साठी पात्र झाले आहेत आणि ते सुद्धा स्पर्धेसाठी तयारी करत आहेत.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *