मराठा आरक्षण :सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाची समोरील सुनावणी पूर्ण,निकालाची तारीख मात्र ठेवली राखून
गेल्या दहा दिवसापासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भात युक्तिवाद सुरू होता. आता हा युक्ती वाद पूर्ण झाला असून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकालाची तारीख राखून ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली घटना पीठासमोर ही सुनावणी फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी महत्त्वाची होती. कारण इतर राज्यांमध्ये सुद्धा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं गेलं होतं. सुप्रीम कोर्टाने खुद्द सांगितलं होतं की फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांना सुद्धा या सुनावणीमध्ये एक पार्टी करा. यामुळेच आजच्या या सुनावणीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून होतं.
इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्यादरम्यान सुप्रिम कोर्टाने राज्यांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असे निर्देश दिले होते. परंतु काही राज्यांमध्ये हे आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा ही जास्त होते. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आधी 16 टक्के आरक्षण दिलं नंतर याला तेरा टक्क्यांवर आणलं. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर आरक्षणासंदर्भात युक्तिवाद झाला.