इंटरटेनमेंट

मंगेशकरांची कन्या ते महाराष्ट्र भूषण, आशाताईंचा सुरमयी प्रवास

गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार  देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.
राज्य सरकारकडून १९९६ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला होता, तर दुसरा पुरस्कार १९९७ मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशा भोसले या मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत. मराठी गाण्यांसोबतच आशाताईंनी बॉलिवूडमध्येही आपल्या स्वरांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक सदाबहार गाणी त्यांनी सिनेसृष्टीला दिली. 

पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जीवनाचा परिचय

आशा भोंसले हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत. त्यांना  फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि म्युसिक इंडस्ट्रीमध्ये  आशा ताई म्हणूनही ओळखले जाते. शास्त्रीय संगीत, गझल आणि पॉप संगीत या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरविली आहे, त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंतच्या चित्रपट प्रवासात 16000 गाण्यांमध्ये आपला आवाज दिला आहे. त्या  फक्त हिंदीमध्येच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्येही गाणी गातात. आशा ताई इतक्या उंचीवर गेल्यानंतर त्यांचा  संघर्षाकडे कधीही दुर्लक्ष करता येणार नाही.आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर एक प्रसिद्ध गायक आणि नायक होते. त्यांचा  वडिलांनी अगदी लहानपणापासूनच संगीत शिकवायला सुरुवात केली. आशा ताई अवघ्या 9 वर्षाची असताना वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले . त्यांना एक मोठी बहीण म्हणजेच लता मंगेशकर –  त्यांना हिंदी सिनेमा स्वर कोकिला म्हणून ओळखले जाते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा ओढा दोन्ही बहिणींच्या खांद्यावर आला, ज्यामुळे त्यांची मोठी बहीण लताजींनी  चित्रपटांमध्ये गाणे आणि अभिनय करण्यास सुरवात केली.  आशा भोसले यांचे पहिले लग्न वयाच्या 16 व्या वर्षी  गणपतराव भोसले यांच्याशी झाले होते. त्याचे लग्न कुटुंबियांच्या इच्छेविरूद्ध होते, ज्यामुळे त्यांना त्यांचे  घर सोडावे लागले. आशाजींचे हे लग्न खूप अयशस्वी ठरले. लग्न मोडल्यानंतर ती आपल्या मुलांसह तिच्या घरी आली. आशाजींचे राहुल देव वरमनशी लग्न झाले. हे लग्न आशाजींनी राहुल देव वर्मनच्या शेवटच्या श्वासापर्यंत यशस्वीरित्या पार पाडले. पहिल्या लग्नापासून आशा जीला तीन मुले आहेत. दोन मुलगे आणि एक मुलगी.  आशा भोसले यांना त्यांचा कारकीर्दीच्या सुरूवातीला खूपच संघर्ष करावा लागला होता, तिने तिच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत बी-सी श्रेणीतील चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. आशा भोसले यांनी 1948 साली सावन आया फिल्म चुनरिया मध्ये तिचे पहिले गाणे गायले होते.आशा भोसले यांना 2001 मध्ये फिल्मफेअर लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला होता . त्यांना उमराव जान या 1981च्या  चित्रपटांमधील दिल चीज क्या है आणि 1986 मधील इज्जत चित्रपटातील मेरा कुछ सनम या दोन्ही गाण्यांसाठी नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तसेच चित्रपट सृष्टीतल्या अमूल्य योगदानासाठी आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 साली देण्यात आला. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *