तेजस्वी यादव ने दिली 26 मार्चला बिहार बंदची हाक
बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी 26 मार्चला बिहार बंदची हाक दिली आहे . तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बिहार बंदची घोषणा केली आहे. बंदची घोषणा करत असताना तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर लोकशाहीच्या हत्येचा आरोप लावला. बिहार विधानसभेत झालेल्या घटनेनंतर तेजस्वी यादव संतप्त झालेले होते. बिहार मध्ये विधानसभेत घडलेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच जनता दलला घेरण्यासाठी आरजेडी आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन 26 मार्चला बंद करणार आहे. विधानसभेच्या घटने बरोबरच शेतकऱ्यांचा मुद्दा तसेच बेरोजगारी या विषयांवरही आवाज यावेळी उठवला जाणार आहे.
राबडी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते स्टेटस तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धारेवर धरलं. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना तेजस्वी यादव म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा सभापतींचा दालनाला घेराव घालण्याची प्रथा ही पहिल्यांदा झाली नाही या आधी सुद्धालोकनायक कर्पूरी ठाकुर यांच्या काळात सभापतींच्या खुर्चीवर बसून हे सभागृह चालवण्यात आले होते तेव्हा कोणीही पोलिसांना बोलावले नाही पण नितीशकुमारांनी पोलिसांना बोलावले यावरून त्यांना लोकशाहीचा किती आदर आहे हे बिहारची जनता पाहतच आहे.