२०२० मधील कोरोनाचा उद्रेक
२०२० साली महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला. महाराष्ट्रातील जीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. १५ जून २०२० पर्यंत एक लाख दहा हजार ७७७ जणांना या विषाणूची लागण झाली. त्यापैकी ४१२८ जणांचा मृत्यू झाला आणि ५६ हजार ४९ जण पूर्ण बरे झाले.
कोरोना व्हायरस व्यास सुमारे १२० नॅनोमीटर आहे .विद्युत परमाणु सूक्ष्म लेखामधील विषाणूचा लिफाफा विद्युत परमाणु दाट कवच असलेले एक वेगळी जोडी म्हणून दिसून येते .२०१९ मध्ये कोरोनाव्हायरसला कोविड – १९असे नाव देण्यात आले, सुरुवातीस आसपासच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून याने रोग्यांच्या मरण्याचे प्रमाण मोठे आहे. १३ मार्च २०२० अखेरच्या भागात १७५८ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण चार हजार ९५५ जणांचा मृत्यू झाला. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला आहे.
सहा एप्रिल २०२० अखेर जगात एकूण बारा लाख दहा हजार ९५६ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ६७ हजार ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे , महाराष्ट्रामध्ये दिनांक २८ मार्च २०२० पर्यंत १८१ करोना रुग्ण आढळले आहेत, महाराष्ट्रामध्ये दिनांक २३ मार्च २०२० पर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे , महाराष्ट्रातील इतिहासात अत्यावश्यक सेवा व सामग्री सोडून प्रथम सर्व महत्वाची देवस्थाने बंद ठेवण्यात आली होती महाराष्ट्र राज्यात १५ जून २०२० पर्यंत एक लाख दहा हजार ७४४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ४१२८ जणांचा मृत्यू झाला.
कोरोना व्हायरस या पार्श्वभूमीवर राज्यात मास्कचा तुटवडा भासत असलेल्या काळाबाजार मुंबई क्राईम ब्रँचने लावला. मुंबईच्या वांद्रे परिसरात २४ मार्च २०२० रोजी केलेल्या कारवाईत अंदाजे १४ कोटी रुपयांचे २५ लाख मास्क जप्त करण्यात आले .पुण्यात मास्क विकणाऱ्या चार मेडिकल स्टोअर्स वर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. या चारही मेडिकल स्टोअर्स औषध खरेदी आणि विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले.कोरोना पसरत असताना जनतेला भयभीत करणारे खोडसाळ संदेश , उपचाराबाबत नसलेली संशोधने चुकीची माहिती शास्त्रीय उपचार सांगून संभ्रमीत करणारे संदेश धार्मिक तेढ निर्माण होऊ शकणारे संदेश समाज माध्यमातून पसरविण्यात आले , व मूत्र गाईचे शेण खाल्ल्याने करोना पळून जाईल,
महिन्यातील सर्वात काळा दिवस म्हणजे अमावस्येच्या दिवशी रविवारी जनता संचारबंदी संपल्यावर लोकांनी शंखनाद करीत टाळ्या वाजवल्याने कोरोना विषाणूची मारक क्षमता कमी झाली असल्याचे संदेशही समाज माध्यमात दिले गेले, समाजातील मुसलमान व्यक्ती भाजी मंडई विक्री करताना आढळली तर त्याच्याकडून काही खरेदी करू नका तसेच त्यांना आपल्या गल्लीत येऊ देऊ नका अशा आशयाचा संदेश व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पसरविण्यात आला आणि जनमानसात द्वेष निर्माण होऊन जातीय एकोपा टिकण्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता पाहून पोलिसांनी ग्रुप ॲडमिन सह बऱ्याच सदस्यांवर ही गुन्हे दाखल केले होते.