इकॉनॉमी

सोशल मीडियाच्या पोस्ट्समध्ये वादग्रस्त मजकूराची वाढ,सरकारची कारवाई

तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे भलेही लक्ष नसेल पण तुम्ही काय स्टेटस टाकत आहात, त्यामागचा उद्देश काय,तुम्ही काय शेअर करत आहात यामध्ये सरकारचे लक्ष मात्र वाढत चालले आहे.फेसबूक एक असं व्यासपीठ जे भावना व्यक्त करण्यासाठी ओळखले जाते.या फेसबुकच्या अकाउंट्स बद्दलची माहिती मिळवणे,शेअर कन्टेन्ट ब्लॉक करणे किंवा सुरक्षिततेसंबंधी सरकारने दिलेल्या निर्देशांकेच्या आकडेवारीतून सरकारचे यामध्ये असलेले स्वारस्य दिसून येते.सरकारने केलेल्या निर्देशांची या अकाऊंट बद्दलची आकडेवारी पाहिली तर २०१३ मध्ये ४१४४ निर्देश फेसबुकला मिळाले होते.यानंतर २०१५ मध्ये कन्टेन्ट वर बंधने घालण्याची संख्या १५ हजारांवर गेली होती पुढे पाच वर्षे ही मालिका वाढतच गेली तसेच २०२० मध्ये सरकारच्या वतीने ५७ हजारांहून अधिक अकाऊंटची माहिती घेण्याचे निर्देश मिळाले. २०१९ मध्ये ही ३० हजार एवढी होती.सोशल मीडियाच्या या जगात खोट्या बातम्या, वाढत चाललेला द्वेष,धोकादायक मजकूर आणि बाललैंगिक घोषणाच्या प्रकरणातून याचे गांभीर्य दिसून येते.माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी १७ हजार युआरएल, अकाऊंट व वेब पेज ब्लॉक करण्यात आले. यात निम्म्याहून अधिक २०२० मध्ये ब्लॉक झाले तर चार वर्षात ब्लॉगची ही मालिका चौपटीने वाढताना दिसून आली.असे सांगण्यात आले की,सरकार ही कारवाई आयटी कायदा २००० च्या कलम ६९ अन्वये करत आहे. यामागे सरकारचा देशाचे सार्वभौमत्व कायम ठेवण्याचा उद्देश आहे. भडक मजकूर रोखण्या मागची कारणे इतर देशांची मैत्रीसंबंध व कायदा व सुव्यवस्था राखणे असे सांगण्यात येत आहे.फेसबुक ने दिलेल्या अहवालानुसार २०१९ च्या शेवटी १६ लाख पोस्ट धोक्याचा मजकूर असलेल्या सापडल्या. तर २०२० च्या शेवटी ही संख्या ८३ लाखांवर गेली होती म्हणजेच यामध्ये पाच पटीने वाढ झालेली स्पष्ट झाली.एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार,सर्वाधिक फेसबुकचे युजर्स हे भारतातले आहेत.३२ कोटी फेसबूक युजर्स हे भारतातले असून १९ कोटी अमेरिका आणि १४ कोटी फेसबूक यूजर्स इंडोनेशियातील आहेत.

असे झाले ब्लॉकिंग:

वर्ष कारवाई

२०१७- १३८५
२०१८ – २७९९
२०१९- ३६०३
२०२०- ९८४९

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *