मुंबईचे पोलिस आयुक्त पदावर हेमंत नगराळेच का?
मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी हेमंत नगराळे हे आता मुंबई पोलीस आयुक्त असतील.
नगराळे हे इ. स. १९८७ च्या आयपीएस बॅचच्या महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत. चंद्रपुरातल्या नक्षलग्रस्त भागातून काम सुरू करणारे नगराळे
यांनी मुंबई, नवी मुंबई, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांसह अनेक मोठ्या शहरांमधली कायदा-सुव्यवस्था सांभाळली आहे.
त्यांनी दोन वर्षांसाठी महावितरणच्या वीज आणि सेक्युरिटी विभागाचे प्रमुख पद भूषवले आहे.
ज्या दरम्यान महावितरणच्या महसुलात मोठी वाढ झाली होती, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणावर रीकव्हरीज वाढवल्या होत्या.
नगराळे यांचं नाव मोठ्या घोटाळ्याच्या तपासात मुख्याधिकारी अशी सुद्धा आहे.
जशे की तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा, एमपीसी पेपर घोटाळा याशिवाय सीआयडी आणि स्टेशनवर त्यांनी कामे केली आहेत.
१३० कोटींची केतन पारेखची केस असो अथवा १८०० कोटींचा माधवपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, ४०० कोटींचा हर्षद मेहता घोटाळा
या सर्व प्रकरणाच्या चौकशीत ते जवळून निगडीत होते.
ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांची डीजी पदी वळती करण्यात आली आणि आता ते मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
पण नगराळेच का?
कारण नक्षलग्रस्त भागातील लॉ अँड ऑर्डर प्रश्न असो अथवा नवी मुंबईत मराठा आरक्षणादरम्यान ते आंदोलन हाताळण्याची कर्तबगारी असो
बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर सोलापुरात दंगल उसळू नये हे लोकांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न असो,
त्यांचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड बऱ्यापैकी क्लीन राहिलेला आहे.
त्यांच्या नावावर कुठलेही मोठे वाद आढळत नाही. दुसरीकडे राज्य सरकार मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी सापडल्यानंतर बर्यापैकी बॅकफूटवर गेले आहेत.
अशा काळात सचिन व त्यांना अटक झाली आणि विरोधकांनी नंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अशात परमवीर सिंग यांची बदली होणार एक शक्यता होतीच आणि अखेर झालंही तसंच त्यामुळे एक प्रकारे या सरकारला सध्या एका स्वच्छ प्रतिमा असलेल्या अधिकाऱ्यांची गरज होती.
आणि संजय राऊत यांच्या ट्विटवरून सुद्धा तेच स्पष्ट होतं त्यांनी म्हटले की मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलाला
एक नवीन नेतृत्व मिळालं आहे.
आपल्या पोलिस दलाची परंपरा महान आहे एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणी राहू नये.
खाकी वर्दीचा मान आणि शान यापुढील काळात अधिक किमतीने आणि सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा आहे असं ते म्हणाले आहेत.
त्यामुळे ही बदली मोठी आहे आणि त्याचे राजकीय तसेच सामाजिक पैलू सुद्धा आहेत.