पॉलिटीक्स

जळगावमध्ये सेनेकडून भाजपाचा टप्प्यात कार्यक्रम

जळगाव महापालिकेवर भाजपचा धुव्वा उडवत शिवसेनेने भगवा फडकला आहे. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे. या निकालामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड दिल्याचे दिसून आले आहे. या विजयानंतर पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
काही दिवसांपूर्वी सांगली महागनरपालिकेतही भाजपकडे पुरेसे संख्याबळ असूनही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला होता. तर उपमहापौरपद काँग्रेसला मिळाले होते. त्यामुळे आता सांगलीपाठोपाठ महाविकासआघाडीने जळगावातही भाजपचा टप्प्यात आल्यावर अचूक कार्यक्रमक केल्याचे बोलले जात आहे.
जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे. 
ऑनलाईन मतदान घेण्याला भाजपने विरोध केला होता. महापौरपदासाठी प्रत्यक्ष मतदान व्हावे, असा आग्रह धरत भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती.ऑनलाईन मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. निवडणूक होण्यापूर्वीच जळगाव महानगरपालिकेच्या आवारात शिवसेनेच्या विजयाचे बॅनर्स झळकायला लागले होते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *