अहमदाबाद मध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी-२० सामना
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी २० सामना आज गुरुवार, १८ मार्च संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत तीन सामन्यांनंतर इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. यामुळे भारताला मालिका जिवंत ठेवण्या साठी आज होणार असलेला चौथा सामना जिंकणे आवश्यक आहे. हा सामना भारताने जिंकला तर पाचवा सामना मालिकेतील निर्णायक सामना ठरणार आहे. पण चौथा सामना इंग्लंडने जिंकला तर पाचव्या सामन्याआधीच पाहुणा संघ विजयी आघाडी घेणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत १७ टी २० सामने झाले. यापैकी आठ सामने भारताने आणि नऊ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.भारतीय संघ व्यवस्थापन तीन सामन्यांतील कामगिरीचा आढावा घेऊन काही खेळाडूंना वगळण्याचा तसेच संघाबाहेर असलेल्या निवडक खेळाडूंना खेळवण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. इंग्लंडची कामगिरी बघता त्यांच्या संघात बदलाची शक्यता कमी आहे. टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता . दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे .
संभावित संघ
भारत
रोहित शर्मा, केएल राहुल,ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर,
इंग्लंड
जॉस बटलर , जेसन रॉय , ओइन मॉर्गन , डेविड मलान , जॉनी बेस्त्रो , बेन स्टोक्स , सैम करण,क्रिस जॉर्डन, आदिल राशिद , मार्क वूड, जोफ्रा आर्चर