लाइफस्टाइल

भारतातील २२ शहरे जगातील टॉप ३० प्रदूषित शहरांत सामील

 स्वित्झर्लंडमधील संस्था आयक्यू-एअरने बुधवारी दिलेल्या अहवालानुसार जगातील ३० सगळ्यात जास्त प्रदूषित  शहरातील २२ शहरे ही भारतातील आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. गाजियाबाद हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे.
– खालील शहरे आहवालामध्ये सामील करण्यात आले आहेत. 
 हरियाणामधील – बंधवारी, जिंद, हिसार,फरीदाबाद, फतेहाबाद, यमुनानगर, रोहताक धरूहिरा, गुरुग्रामबिहारमधील – मुझ्झफरपूरराजस्थानमधील –  भिवडीउत्तरप्रदेशामधील – गाजियाबाद, बुलंदशहर, आगरा लखनऊ, मीरत ,कानपूर ,जलालपूर,नोएडा ,ग्रेटर नोएडा, बिसराख जलालपूर.
– अहवालामध्ये काय आहे?  आइक्यूएअर अहवाल १०६ देशांच्या पिम २.५ डाटा वर आधारित आहे. पिम २.५ हे हवेतील घातक बारीक कण आहेत जे तुमच्या नाकाद्वारे थेट फुफ्फुसापर्यंत जात असून त्याची रक्तात जाण्याची शक्यता देखील आहे. अहवालानुसार मागील वर्षापेक्षा १५ टक्क्यांनी दिल्लीतलं प्रदूषणाच प्रमाण कमी झाले आहे. २०२० मध्ये दिल्लीमधील प्रदूषणामुळे  ५४००० लोकांचा जीव गेला. कोरोना आणि लॉकडाउनचा प्रदूषणावर कसा परिणाम झाला याची सुद्धा अहवालामध्ये नोंद केली गेली आहे.
– भारतात प्रदूषण का वाढत आहे?प्रदूषणाचे महत्वाचे कारण लोकसंख्या आणि त्यामुळे दुचाकी चारचाकी यांचा करण्यात आलेला अतिवापर. याला नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली मध्ये ऑड इव्हन रूल लागू केला होता. तरी प्रदूषनावर त्याचा फरक पडला नाही. उत्तर भारतात अधिक प्रदूषण आहे याचे कारण असे की ऑक्टोबर महिन्यात शेतकरी पीक कापणीनंतर  राहिलेले धान्याच्या रोपाचे खुंट जाळतात. दरवर्षी २.३ करोड पिक जाळल्यामुळे हवेत त्याचा परिणाम होतो. भारतातील वाहतुकीमुळे तिथले प्रदूषण वाढत आहे असे त्या अहवालामध्ये म्हणले आहे.
‘२०२१ मध्ये मानवी वर्दळीमुळे आपण प्रदूषणात परत वाढ बघू शकतो. आम्ही आशा करतो कि या अहवालामुळे लवकरात लवकर शक्य आणि गरजेच्या क्रिया संबंधित देश करतील कारण पर्यावरणासाठी प्रदूषण हा सगळ्यात मोठा धोका आहे.’ असे वक्तव्य आयक्यू एअर चे सिईओ फ्रॅंक हॅम्स यांनी केले

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *