स्पोर्ट्स

जॉस बटलरची शानदार ८३ धावांची खेळी;इंग्लंडचा भारतवर 8 विकेट्सनी विजय

इंग्लंडने भारतावर तिसऱ्या टी २० सामन्यात ८ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. जोस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंड ने संघात एक बदल केला दुखापतीतून झालेल्या मार्क वूड ला खेळवले तर टॉम करण ला बाहेर बसावे लागले. भारताने देखील एक बदल केला. सूर्यकुमार यादवच्या जागी उपकर्णधार रोहित शर्माला खेळवण्यात आले.

प्रथम फलांदाजी करताना भारताची सुरुवात परत एकदा चांगली झाली नाही. सलामीवीर केएल राहुल ० वरच बाद झाला. भारताचे २४ धावांनवर ३ गडी बाद झाले होते. या नंतर कर्णधार कोहली आणि यष्टिरक्षक पंतनी विकेट्स वाचून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु पंत देखील बाद झाला. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली होती. अवघ्या २५ चेंडूच्या साहय्याने ही भागीदारी केली आहे. यादरम्यान विराटने जोरदार फटकेबाजी केली. तर हार्दिकनेही विराटला चांगली साथ दिली. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद ७७ धावांची खेळी केली.भारताने निर्धारित २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून १५६ धावा केल्या.इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक ३ तर क्रिस जॉर्डनने २ विकेट्स घेतल्या.

लक्षाचा पाठलाग करायला आलेल्या इंग्लडचा सलामीवीर जेसन रॉय देखील लवकर बाद झाला. परंतु जॉस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या भागीदारीच्या जोरावर हे लक्ष गाठलं. हे विजयी आव्हान इंग्लंडने १८.२ ओव्हरमध्ये २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंडकडून जॉस बटलरने ५२ चेंडूत नाबाद ८३ धावांची खेळी केली. तर जॉनी बेयरस्टोने नाबाद ४० धावा केल्या. भारताकडून चहल आणि सुंदर ने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.८३ धावांची अफलातून नाबाद खेळी करणाऱ्या जॉस बटलरला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.यासह इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *