पॉलिटीक्स

भाजपचे खासदार दिल्लीतील हॉटेलमध्ये सापडले मृतावस्थेत

भाजप खासदार रामस्वरुप शर्मा हे दिल्लीतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले आहेत.

भाजपने शर्मा यांना २०१४ मध्ये लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मंडी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांचा ४० हजार मतांनी पराभव केला.

या निवडणुकीत हिमाचलच्या सर्वच्या सर्व चारही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते.

२०१९ मध्येही शर्मा यांनी मंडीमधून निवडणूक लढली होती आणि विजयी झाले होते.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातली भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू झाला आहे.

दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयाशेजारीच शर्मा यांचा फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये आज सकाळी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नसून त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 रामस्वरुप शर्मा हे हिमाचल प्रदेशातील जोगिंदरनगरचे रहिवासी आहेत. ते सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. खासदार बनण्यापूर्वी ते मंडी जिल्ह्याचे भाजपचे सचिव होते.

त्यानंतर हिमाचल प्रदेशचे भाजपचे सचिव होते. ते हिमाचल प्रदेशच्या फूड अँड सिव्हील सप्लाय कॉर्पोरेशनचे अध्यक्षही होते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *