देश-विदेशपॉलिटीक्स

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून चोरले ९४ कोटी;आरोपी’यूएई’मध्ये अटकेत

मुख्य आरोपींपैकी एकाला संयुक्त अरब अमिराती (यूएई) पोलिसांनी केली अटक

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लंपास करणाऱ्या मुख्य आरोपींपैकी एकाला संयुक्त अरब अमिराती (यूएई) पोलिसांनी अटक केली असून कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमेर शेख असे ‘यूएई’ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची माहिती ‘यूएई’कडून भारताला कळविण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी ११ व १३ ऑगस्ट २०१७ रोजी कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीचवर सायबर हल्ला केला होता; तसेच टोळ्यांनी बनावट एटीएम कार्ड वापरून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये रक्कम काढून घेतली होती.कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत १२ ते १३ आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध १७५० पानांचे दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरून कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्‍ट्रॉनिक माहिती चोरली. याच माहितीचा वापर करून बनावट एटीएम कार्ड तयार केली. बनावट कार्ड वापरात आणण्यासाठी बँकेचे एटीएम स्वीच सर्व्हर हॅक करण्यात आले होते. सायबर हल्ला केल्यानंतर तो पैसा घेण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी देश-परदेशात टोळ्या बनविल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून पैसे काढून घेण्यात आले. याशिवाय हँगकाँगच्या हेनसेंग बँकेत आरोपींनी ११ ते १२ कोटी रुपये पाठविले होते. त्यापैकी सहा कोटी रुपये परत मिळविण्यात पुणे पोलिसांना यश आले.

काय आहे शेखची भूमिका

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यात शेखची महत्त्वाची भूमिका आहे. बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसै काढण्याचे नियोजन आरोपींनी केले होते. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याने केल्याची दाट शक्‍यता आहे. डार्कवेबवरून बँकेच्या ग्राहकांचा डेटा विकणे किंवा विकत घेणे, बनावट डेबिट कार्ड तयार करणे, टोळी तयार करून त्यांना बनावट डेबिट कार्ड पुरविणे आणि हल्ला घडवल्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेणे अशा पद्धतीची भूमिका भूमिका बजावली असण्याची शक्‍यता आहे.

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यातील प्रमुख तीन आरोपींपैकी सुमेर शेख एक आहे. त्याला यूएई पोलिसांनी अटक केली आहे. शेखचा ताबा पुणे पोलिसांना मिळावा, यासाठी भारतीय तपास संस्थांच्या माध्यमातून आम्ही ‘यूएई’ पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यास त्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *